शेतकऱ्याचा नाद नाय! शेतीचे व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून महिन्याला करतोय लाखोंची कमाई

0

 

 

आपण युट्युबवर दिवसरात्र वेगवेगळे व्हिडिओ बघून माहिती घेत असतो. पण यात काही असेही लोक असतात, ज्यांनी युट्युबला एक संधी म्हणून बघितले आहे. तसेच युट्युबवर चांगला कंटेंट टाकून त्यातून ते लाखो रुपये कमवतात.

आजची गोष्ट अशा एका शेतकऱ्याची आहे, जो शेतात वेगवेगळे प्रयोग करुन नफा तर मिळवतोच आहे, तसेच त्याचे व्हिडिओ काढून तो युट्युबवरुन सुद्धा लाखो रुपयांची कमाई करत आहे.

युट्युबवर वेगवेगळ्या शेतीच्या व्हिडिओ टाकून पैसे कमवणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव दर्शन सिंग असे आहे. दर्शन हे हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील पाटवी गावात राहतात.

दर्शन यांचे एक युट्युब चॅनेल असून त्या चॅनेलचे नाव फार्मिंग लीडर असे आहे. त्यांच्या या चॅनेलचे ४० लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आहेत. इतकेच नाही तर रोज त्यांच्या चॅनेलला लाखो नवीन लोक भेट देत असतात. त्यातुन ते महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.

दर्शन सिंग शेतकऱ्यांना शेतीत येणाऱ्या अडणींवर मात कशी करता येईल, तसेच शेतात नवनवीन प्रयोग करुन चांगले उत्पन्न कसे घेता येईल या संबंधित ते व्हिडिओ बनवत असतात.

दर्शन सिंग शेतकऱ्यांसाठी अशा व्हिडिओ बनवतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न तर मिळलेच त्यासोबत ते लाखोंची कमाई पण करु शकतील.दर्शन सिंग ऑर्गेनिक फार्मिंग, पशुपालन यांसारख्या विषयावर व्हिडिओ बनवत असतात.

त्यांनी सुरुवातीला या व्हिडिओ मोबाईलमध्येच काढण्यास सुरुवात केली होती. तसेच ते व्हिडिओ कधी तरी काढायचे आणि अपलोड करायचे. पण जेव्हा त्यांना कळाले की त्यांच्या या व्हिडिओमुळे इतर शेतकऱ्यांना शेती संदर्भात चांगली माहिती मुळत आहे, तेव्हा त्यांनी नियमितपणे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती.

दर्शन या युट्युब चॅनेलच्या मदतीने महिन्याला दोन ते तीन लाखांपेक्षा जास्त रुपये कमवत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या चॅनेलमुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे स्वता:चे युट्युब चॅनेल सुरु केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.