कोरोनात लोकांना आजारी पाहून सुचली भन्नाट आयडीया, आता महिन्याला करतोय लाखोंची कमाई

0

 

कोरोनाच्या काळात अनेक लोकांची नोकरी गेली आहे, त्यामुळे काही लोकांनी स्वता:चा व्यवसाय सुरु केला आहे, तर काही आपल्या गावी जाऊन पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे. आजची गोष्टही अशाच एका तरुणाची आहे.

उत्तराखंडमधल्या अल्मेडा जिल्ह्यातील नौवाडा गावात राहणाऱ्या या तरुणाचे नाव दानसिंग असे आहे. कोरोनाच्या काळात मानसिंगची नोकरी गेली पण खचून जाता त्याने हर्बल चहा बनवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे आणि त्यातून तो आता महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.

मानसिंग ज्या गावात राहतो त्या गावात रोजगारच्या एवढ्या संधी नाहीये, त्यामुळे त्या गावातून लोकांचे स्थलांतर होत राहते. पण कोरोनामुळे अनेक लोक गावी परतले आहे. अशात कोरोनामुळे इम्युनिटी बुस्टर पदार्थांची मागणी तिथे वाढत होती.

एकेदिवशी त्याचे लक्ष सहज त्याच्या गावातील डोंगरावर असणाऱ्या गवतावर गेली होती. या गवताचा वापर गावातील लोक सर्दी ताप आल्यावर घरगुती उपाय म्हणून घ्यायचे. त्याने गवत आणले आणि त्याची चहा बनवली. त्याने आजारी असलेल्या लोकांना ती चहा दिली असता, त्यांना लगेच फरक जाणवला.

तिथूनच त्याने गावातील गवताच्या साहाय्याने हर्बल चहा बनवण्यास सुरुवात केली. त्याने चहासोबतच सर्दी खोकल्याच्या अडचणी दुर करण्यासाठी काढा बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या चहाची मागणी चांगलीच वाढली आहे.

सुरुवातीला त्याने त्याच्या मित्रांना सांगितले होते, तिथून त्याला ऑर्डर्स मिळायला सुरुवात झाली होती, त्यानंतर त्याच्या चहाची मागणी वाढत होती. त्यामुळे आता त्याने ऍमेझॉनवरही हा हर्बल चहा विकण्यास सुरुवात केली आहे. या व्यवसायातून तो महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.

या कल्पनेमुळेच आज दानसिंग लाखोंची कमाई करुन आपले कुटुंब सांभालतो आहे. त्याच्या ही कल्पना पाहून गावातील अन्य लोकांनीही हर्बल चहा बनवण्यास सुरुवात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.