दादासाहेब फाळके: केवळ १५ हजारात बनवला चित्रपट व स्वत: त्याच्यात अभिनेता म्हणून केले काम

0

सगळ्यांना माहित आहे की दरवर्षी दादासाहेब फाळके हा पुरस्कार मनोरंजन विश्वातील सर्वात उच्च पुरस्कार मानला जातो. मनोरंजन विश्वात विशेष कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो.

तुम्हाला कदाचित माहित नसेल पण गेल्या पाच दशकांपासून हा पुरस्कार साऊथ सुपरस्टार रजनिकांत यांना दिला जात आहे. पण ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो? त्यांचे कार्य काय होतो? हे तुम्हाला माहिती आहे का? आज त्यांच्या जयंत्तीनिमित्त आपण काही त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांचे खरे नाव धुंडिराज गोविंद फाळके असे होते. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी झाला होता. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि एक उत्तम लेखकही होते. १९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ९५ पेक्षा जास्त चित्रपट केले होते.

दादासाहेब फाळके यांना नेहमीच कलेत रस होता. त्यांना याच क्षेत्रात नाव कमवायचे होते. १८८५ मध्ये त्यांनी जे जे कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. तसेच त्यांनी वडोदरा येथील कलाभवन येथून पुढचे शिक्षण घेतले होते.

१८९० मध्ये दादासाहेब वडोदरा येथे गेले आणि त्यांनी तेथे काही काळ छायाचित्रकार म्हणून काम केले. आपली पहिली पत्नी आणि मुलाच्या निधनानंतर त्यांनी नोकरी सोडली होती. त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी स्वताची प्रिटींग प्रेस चालू केली.

तेथे त्यांची भेट भारतीय कलाकार राजा रवी वर्मा यांच्याशी झाली आणि ते दोघे मिळून एकत्र काम करू लागले. त्यानंतर दोघेही प्रथमच भारताबाहेर म्हणजे जर्मनीला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनातला पहिला चित्रपट पाहिला ज्याचे नाव होते लाईफ ऑफ क्राइस्ट.

त्यानंतर त्यांनी पहिला चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट तयार करण्यासाठी त्यांना ६ महिन्यांचा कालावधी गेला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीने आणि मुलानेही साथ दिली. त्या चित्रपटाचे नाव होते राजा हरिश्चंद्र.

हा चित्रपट तयार करण्यासाठी त्यांना १५ हजार रूपये लागले होते. आज जरी ही रक्कम किरकोळ वाटत असली तरी त्या काळात त्या १५ हजारांची किंमत खुप होती. स्वता दादासाहेबांनी यामध्ये राजा हरिश्चंद्राचा रोल केला होता.

त्यांच्या पत्नीने पोशाख बनवायचे काम केले होते. आणि त्यांच्या मुलाने राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भुमिका साकारली होती. त्यावेळी कोणतीही स्त्री त्या चित्रपटात काम करण्यासाठी तयार होत नव्हती त्यामुळे एका पुरुषाने या चित्रपटात स्त्रीची भूमिका साकारली होती.

हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी मुंबईमधील कोरोनेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला खुप प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांनी दादासाहेबांना खुप प्रेम दिले. चित्रपट सुपरहिट झाला होता. दादासाहेब यांचे भारतात चित्रपट बनवण्याचे स्वप्न पुर्ण झाले.

अशा प्रकारे हा चित्रपट आणि दादासाहेब इतिहासात अजरामर झाले आणि भारतात पहिल्यांदा चित्रपटाची मुळे रूजण्यास सुरूवात झाली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.