दादा कोंडके: ज्यांनी पाहिले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पण…

0

चित्रपटांमध्ये विनोदाची आणि विनोद कलाकारांची भूमिका खूप महत्वाची असते. जेव्हा चित्रपटांमध्ये विनोदी गोष्टी येतात तेव्हा दादा कोंडके यांचे नाव सगळ्यात आधी घेतले जाते. दादा कोंडके एक विनोदी कलाकार, एक गीतकार आणि लेखक देखील होते. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी पार्श्वभूमीतून आलेल्या या अभिनेत्याची ख्याती सर्वांनाच माहिती आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांनी दुहेरी अर्थ संवादाची किंवा चित्रपटांची प्रथा सुरू केली होती. एक कलाकार जो केवळ सामान्य वर्गातील लोकांसाठी मनोरंजनाचे केंद्र नव्हते तर आपल्या अभिनयाने गरिबांच्या थकवा दूर करण्याचे एक साधनही होते. या सामान्य वर्गाला हेही ठाऊक होते की दादा कोंडके यांचा चित्रपट बघायला गेले तर हसण्याची हमी तर नक्कीच आहे.

तो काळ असा होता की मराठी चित्रपटांमध्ये विनोदी भुमिका असायच्या, पण दादा कोंडके यांच्या चित्रपटांमुळे कॉमेडी इतकी बदलेल याची कोणालाही कल्पना नव्हती. दादा कोंडके यांच्या चित्रपटात दोन प्रकार होते. एक जण त्याच्या कॉमेडीचा खूप आनंद घ्यायचा आणि दुसरा त्यांच्यावर टिप्पणी करत असे.

त्यावेळी दादा कोंडके यांचे ९ चित्रपट २५ आठवड्यांपेक्षा अधिक काळ थिएटरमध्ये होते. याची नोंद गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली आहे. बॉलिवूडमध्येही दुहेरी अर्थ संवाद आणि विनोद हाती घेण्यात आले आहेत. काही चित्रपटांमध्ये, तुम्हाला गोविंदा दिसेल किंवा लक्ष्मीकांत बेर्डे दिसतील, ज्यांनी ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हम आपके हैं कौन’ मध्ये काम केले आहे त्यांना पाहून तुम्हाला दादा कोंडकेंची आठवण येईल. मात्र, असे करूनही दादा कोंडके यांना सिनेमात गांभीर्याने घेतले गेले नाही.

८ ऑगस्ट १९३२ रोजी दादा कोंडके यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव कृष्णा दादा कोंडके होते. तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट १९६९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर चंदू जमादार, राम-राम गंगाराम, राम राम आमथाराम, एकटा जीव सदाशिव, तुमचं आमचं जमलं आणि अंधेरी रात में दिया तेरे हाथ में असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी मराठीत चांगली कामगिरी केली, तर ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’ हिंदीमध्ये खूप लोकप्रिय झाला.

१९९४ च्या दशकात त्यांचा शेवटचा चित्रपट सासरचंधोतर होता. त्याचे दिग्दर्शनही कोंडके यांनी केले होते. ३० सप्टेंबर १९९७ रोजी दादा कोंडके यांचे निधन झाले. दादा कोंडके यांचे एक मराठी नाटक होते. ‘विच्छा माझी पुरी करा’ म्हणजे माझी इच्छा पूर्ण करा. ही १९६५ ची गोष्ट आहे. या नाटकानंतर लोक त्यांना ओळखू लागले. हे नाटक वसंत सबनीस यांनी लिहीले होते आणि ते समाजवादी विचारसरणीचे होते.

ही कथा एक राजा, त्याचा मूर्ख कोतवाल आणि एक सुंदर नर्तक अशी होती. जे बर्‍यापैकी लोकप्रिय होते, पण कोंडके यांच्या खास विचारसरणीमुळे या नाटकाचा संदेश कॉंग्रेसच्या विरोधात गेला होता. या नाटकात त्यांनी डबल मिनींग तसेच लैगिंक विनोदही केले होते. हे नाटक हिट ठरले, पण सबनीस यांना हे आवडले नाही.

कोंडके यांनी चित्रपटात येण्यापूर्वी या नाटकाचे सुमारे १५०० शो केले होते. मार्च १९७५ मध्ये हैदराबादमध्ये त्यांचा शेवटचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर आणीबाणी लागू करण्यात आली होती. १९७५ साली दादा कोंडके यांचा ‘पांडू हवालदार’ हा चित्रपट आला. यात त्यांचे नाव दादा कोंडके असेच ठेवण्यात आले होते. हा चित्रपट इतका हिट झाला की महाराष्ट्रातही हवालदारांना अजूनही पांडू म्हणतात.

दादा कोंडके यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचे लहानपण आणि सुरुवातीचे आयुष्य मुंबईच्या लालबागमध्ये एका छोट्याशा क्वार्टरमध्ये गेले पण तेथेही दादा खुप फेमस होते. ते तेथे मारामारी, भांडणे, दंगामस्ती करण्यात पटाईत होते. हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

लालबागमध्ये माझी दहशत होती. जो पण तिथे गुंडागर्दी करायचा त्याच्याशी माझी भांडणे व्हायची. आमच्या शेजारच्या एखाद्या मुलीला कोणी छेडले तर मी तिथे पोहोचायचो. सोडा पाण्याच्या बाटल्या, दगड, विटा या सर्व गोष्टींनी मी मारामारी करायचो असे स्वता दादा कोंडकेंनी एका मुलाखतीत सांगितले होते.

१९७१ मध्ये दादा कोंडके यांचा सोंगाड्या चित्रपट आला होता त्यावेळी ते शिवसेनेत दाखल झाले होते. हा चित्रपट हिट ठरला. देव आनंदच्या जॉनी मेरा नाममुळे दादा कोंडकेंच्या चित्रपटाला दादर येथील कोहिनूर थेटरने नकार दिला होता. पण त्यांनी आधीच बुकींग करून ठेवली होती तरीही दादा कोंडकेंना त्यांनी नकार दिला होता.

कोंडके हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. यावर शिवसैनिकांच्या सैन्याने नाट्यगृहाबाहेर आंदोलन केले आणि खळबळ उडाली, त्यानंतर कोहिनूरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर त्यांनी शिवसेनेच्या राजकीय सभांमध्ये गर्दी जमवण्याचे काम सुरू केले. त्यांचे चाहते खुप होते. दादा कोंडके काहीही म्हणाले तरी लोक हसायचे आणि आरडाओरडा करायचे.

ज्योतिषांनी दादा कोंडके यांच्याबद्दल सांगितले होते की ते चित्रपटांमध्ये यशस्वी होणार नाहीत. पण ते चित्रपटांत स्टार झाले. एका घाणेरड्या चाळीतून ते करोडपती बनण्याचा प्रवास त्यांनी केला होता. ते म्हणायचे की माझे स्वप्न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे आहे. बाळ ठाकरे त्यांना ही संधी देतील असे त्यांचे मत होते, पण तसे होऊ शकले नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.