कोविड योद्ध्याला सलाम! १८ किलोमीटर स्वतः होडी चालवून ‘ही’ महिला पार पाडतेय आपले कर्तव्य

0

 

कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आशा सेविका, सफाई कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडताना दिसून येत आहे. आता जनतेची मदत करणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवत कोविड योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी पूर्ण करताना दिसत आहे.

काही कोविड योद्धांनी तर यात आपला जीवदेखील गमावला आहे. तरीही कोविड योद्धे आपली जबाबदारीपासून मागे नाही सरकले. असेच काहीसे अंगणवाडी सेविकांचे आहे. आपल्या परिस्थितीवर मात करत त्या आपल्या कर्तव्याचे पालन करताना दिसून येत आहे.

कोरोनाच्या काळात काही महिला घरोघरी जाऊन तपासणी करताना दिसत आहे. कोणत्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यापासून दुसऱ्या कोणाला तरी याचा संसर्ग तर होणार नाही ना या गोष्टींची काळजी अंगणवाडी सेविका घेताना दिसत आहे.

शहरी भागात घरोघरी जाऊन तपासणी करणे सोपे आहे, मात्र हेच काम जर ग्रामीण भागात जाऊन करणे जरा कठीणच आहे. ग्रामीण भागात संपर्काची साधने नसल्याने आपले काम पूर्ण करणे सेविकांना कठीण होत चालले आहे. तरीही आपले काम पूर्ण जबाबदारी निभावताना अनेक सेविका दिसत आहे, त्यापैकीच एक म्हणजे रेलू वसावे.

२७ वर्षीय रेलू नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. ज्या ठिकाणी रेलू आपले काम करत आहे, तो भाग आदिवासी आहे. रेलू सहा वर्षांच्या मुलांचे आणि त्यांच्या आईचे वजन, योग्य आहार, आरोग्य यावर लक्ष ठेवण्याचे काम करत आहे.

अशात आलेल्या या कोरोना संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे तिथले अंगणवाडीत जाणारे मार्ग बंद झालेत. मात्र रेलू यांच्यावर २५ नवजात शिशु आणि ७ गर्भवती महिलांची जबाबदारी होती, ती रेलू यांना पार पाडायची होती. कोरोनाच्या भीतीमुळे स्त्रिया अंगणवाडी यायला तयार नव्हत्या.

त्यामुळे रेलू यांनी स्वतः गावात जाऊन स्त्रियांना भेटण्याचे ठरवले पण गावात जाण्यास नर्मदा नदी अडचण ठरत होती. गावात जायचे असेल तर रेलू यांना १८ किलोमीटरची नदी पार करून गावात जावे लागणार होते, मात्र आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी गावात जाण्याचा निर्णय घेतला.

मूळ नाशिकच्या असल्याने रेलू यांना होडीच्या प्रवासाबद्दल माहिती होते. त्यामुळे त्यांनी स्थानिक नावड्याकडून होडी घेतली आणि त्या दररोज त्यांचे काम करू लागल्या. रेलू नेमाने बाळांकडे आणि तिथल्या महिलांना भेट देऊ लागल्या.

कोरोना संकटात जे काही घडत आहे, त्यात नवजात बालकांचा काही दोष नाही. त्यामुळे मला असे वाटते की एक अंगणवाडी सेविका म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणे माझे कर्तव्य आहे, असे रेलू यांनी म्हटले आहे.

रेलू फक्त पगार मिळतो म्हणून काम करत नाही, तर समाजाला आपले काही देणे आहे, हे समजून रेलू काम करतात. रेलू यांचा आपल्या कामाबद्दलचा प्रमाणिकपणा आणि त्यांची जिद्द अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.