‘हा’ कॉन्स्टेबल आपला पूर्ण पगार खर्च करतो गरीब मुलांसाठी; ३० मुलांना लावून दिली सरकारी नोकरी

0

समाजात खूप कमी लोक असे असतात, जे आपल्या कुटुंबासोबतच समाजाच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. आजची ही गोष्ट अशा एका माणसाची आहे जो समाजाच्या कल्याणासाठी आपला पूर्ण पगार खर्च करत आहे.

लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. त्या फोटोंमध्ये पोलीस कर्मचारी गोरगरीब मुलांना शिक्षण देण्याचे काम करत आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अमित लाठीया असे आहे.

अमित लाठीया हे हरियाणातील सोनीपत येथे राहतात. २०१० साली अमित यांची पोलीस सेवेत कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली होती. अमित गेल्या ७ वर्षांपासून गरीब आणि गरजू मुलांना शिक्षण देऊन सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी तयार करत आहे.

अमित यांचे लहानपण खूप संघर्षात गेले. कोचिंगसाठी पैसे नव्हते त्यामुळे अमित पार्टटाईम जॉब करायचे. त्यांना देशाची सेवा करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी पोलीस भरती दिली आहे त्यांची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली. तेव्हापासूनच त्यांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला.

अमित यांनी हे काम सुरू केले त्याची पण एक वेगळीच गोष्ट आहे. अमित एकदा एका रिक्षामध्ये बसलेले होते, ती रिक्षा एक १७-१८ वर्षाचा मुलगा चालवत होता. त्या मुलाची विचारपूस केली असता त्याची आर्थिक स्थिती खराब असल्याचे त्याने सांगितले होते.

परिस्थिती खराब असल्याने त्याला रिक्षा चालवावी लागत असल्याचे त्याने सांगितले. त्या मुलाचे नाव विनय असे होते. पुढे अमित यांनी विनयची मदत केली आणि आता तो पोलीस सेवेत आहे.

विनय शिवाय तिथे दोन मुले अजून होती. त्यांचे आईवडील नव्हते, तेव्हापासूनच अमित यांनी या अभियानाला सुरवात केली होती. अमित यांनी एक-एक करून ३० मुलांच्या राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची सोय केली आहे.

आजवर अमित यांनी १०० मुलांची जबाबदारी घेतली असून त्यापैकी ३० मुलांना त्यांनी सरकारी नोकरी लावून दिली आहे. आजही ते २५ गरजू मुलांना सांभाळत असून त्यांच्या राहण्याची जेवण्याची सोयीसोबत शिक्षणाचा खर्च ते उचलत आहे.

अमित आपला पूर्ण पगार गरजू मुलांसाठी खर्च करत असतात. जेव्हा त्यांची सकाळी ड्युटी असते तर संध्याकाळी मुलांना शिवतात. जर ड्युटी रात्रीची असेल तर ते मुलांना सकाळी शिकवतात, असे अमित यांनी सांगितले आहे.

शिक्षणासोबत ते फिजिकल परिक्षेसाठी सुद्धा मुलांना तयार करत असतात. एका मुलाला जर नोकरी मिळाली तर तो आपल्या पूर्ण कुटुंबाला सांभाळू शकतो, असे अमित यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.