रामदास आठवले आणि कलरफूल कपडे नक्की काय आहे कनेक्शन जाणून घ्या

0

महाराष्ट्रातील नेते  म्हटले की त्यांचे पांढरे कपडे लगेच समोर येतात, तसेच महाराष्ट्रातील नेते त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

अशात महाराष्ट्रात एक असा पण नेता आहे, जो आपल्या वक्तव्यापेक्षा विनोदी कविता आणि आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. ते नेते म्हणजे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले.

रामदास आठवले सध्या सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. तरीही बऱ्याचदा त्यांच्या रंगीबेरंगी कपड्यांमुळे त्यांना टिकेचा सामना करावा लागला आहे. ते कधी सुटबुटात, तर कधी रंगीबेरंगी जॅकेटमध्ये नेहमीच दिसत असतात.

रामदास आठवले असे रंगीबेरंगी कपडे का घालतात? त्यामागचे कारण काय आहे, त्यांच्या कपड्यांचा डिझायनर नेमका कोण आहे, असा प्रश्न नेहमीच लोकांना पडतो. पण तुम्हाला माहितीये का रामदास आठवले यांच्या कपड्यांचा कोणताही एक डिझायनर नाही.

रामदास आठवले नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांच्या कपड्यांची खरेदी करत असतात. ते नेहमीच आपल्या आवडीनुसार कपडे खरेदी करत असतात. असे त्यांच्या प्रसिद्धीच काम पाहणारे मयुर बोरकर यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले यांनी रंगीबेरंगी कपडे घातल्याने ते लोकांशी लवकर कनेक्ट होतात, असे रामदास आठवले यांचे राजकारण जवळून अनुभवणारे जेष्ठ पत्रकार सुरेश ठमके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले आहे.

रामदास आठवले हे ज्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात, ते ज्या समाजातून येतात तो अजूनही तितकासा पुढारलेला नाही. त्या समाजात अजुनही लांब केस ठेवण्याची आणि  रंगीबेरंगी कपडे घालणण्याची फॅशन आहे, त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रामदास आठवले असे कपडे घालतात, असेही सुरेशी ठमके यांनी सांगितले आहे.

तसेच आठवले यांचे कपडे पाहताना ते जरी रंगीबेरंगी दिसत असले तरी ते ब्रँडेड असतात. लोकांना त्यांचे रंगीबेरंगी कपडे विचीत्र वाटू शकतात. पण आठवलेंना मी तुमच्यातलाच एक आहे, असे दाखवायचे असते, त्यामुळे ते असे कपडे घालत असतात, असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.