राज्यात महाविकास आघाडी असो किंवा राजस्थानात पायलट प्रकरण; सगळ्यांची धुरा सांभाळणारा होता ‘हा’ नेता

0

 

काँग्रेसचे वरीष्ठ नेते अहमद पटेल यांचे बुधवारी निधन झाले आहे. एक महिन्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि आज (बुधवार) पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.

अहमद पटेल काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहमद पटेल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेसला एक मजबूत पक्ष बनवण्यात अहमद पटेल यांचे मोठे योगदान राहिले आहे. जाणून घेऊया अहमद पटेल यांच्याबद्दल…

अहमद पटेल यांचा जन्म गुजरातच्या पिरामन गावात २१ ऑगस्ट १९४९ मध्ये झाला होता. त्यांचे वडील समाजसेवक होते. लहान असतानाच अहमद पटेल ‘युथ काँग्रेस’च्या विद्यार्थ्यांसोबत काम करत होते.

आपल्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेसवर आलेल्या अनेक संकटांपासून त्यांनी काँग्रेसला वाचवलेले आहे. तसेच काँग्रेसमध्ये जर एखादा नेता नाराज झालेला असेल तर त्याची नाराजी दूर करण्याचे काम अहमद पटेल यांनी केले आहे. त्यामुळे पक्ष मजबूत बनवण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे.

अहमद पटेल वयाच्या २८ व्या वर्षीच खासदार झाले होते. १९७७ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुक झाल्या होत्या तेव्हा भरुच मतदार संघातून पटेल पहिल्यांदाच उभे राहिले होते. तेव्हा आणीबाणीमुळे लोकांची काँग्रेसवर नाराजी होती, तरी अहमद पटेल ६२ हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते. तेव्हा अहमद पटेल २८ वर्षाचे होते.

पुढे १९८० आणि १९८४ मध्ये पण भरुच मतदार संघातून अहमद पटेलांनी लोकसभा निवडणुक लढली आणि विजय मिळवला. मात्र १९८९ च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता, पुढे त्यांची निवड राज्यसभेत करण्यात आली. याच काळात १९८६ मध्ये ते गुजरातमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते.

काँग्रेसमधल्या नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यात अहमद पटेल यांनी मोठी भूमिका निभावली आहे. तसेच अहमद पटेल यांनी २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस सरकारमध्ये मोठी भूमिका बजावणारे नेते होते.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात पण अहमद पटेल यांनी मोठी भूमिका निभावलेली आहे. तसेच जेव्हा राजस्थान सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड केले होते, तेव्हाही अहमद पटेल यांनी काँग्रेसला एकजूट ठेवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले होते.

सर्व राजकीय नेत्यांना तेव्हा असे वाटत होते की, सचिन पायलट ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे भाजपमध्ये जातील, पण पडद्यामागून अहमद पटेल यांनी काम करत सचिन पायलट यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये आणले.

अहमद पटेल यांनी काँग्रेस पक्षाची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अहमद पटेल यांनी गुजरामध्येही भाजपला पराभूत केले होते. अहमद पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.