बापाकडून १ लाख घेऊन उभी केली १० हजार कोटींची कंपनी; आता समाजकार्यासाठी विकले ९० कोटींचे शेअर्स

0

 

सध्या समाजात खूप कमी लोक अशी असतात असतात, जी आपल्या कुटुंबासोबतच समाजातल्या गरजू लोकांचाही विचार करतात. तसेच त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात. आता पुन्हा एकदा असेच एक उदाहरण समोर आले आहे.

इलेक्ट्रीक अप्लायंस मॅन्युफॅक्चरर वी-गार्ड कंपनीचे प्रोमोटर चित्तिलापिल्ली यांनी समाजकार्यासाठी तब्बल ९० कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. त्यामुळे सगळीकडेच त्यांची चर्चा सुरु आहे.

त्यांनी वी-गार्ड कंपनीचे ४० लाख शेअर्स विकले आहे. त्यांना आधीपासूनच समाजासाठी काहीतरी करायचे होते. त्यांचे चित्तिलापल्ली फाऊंडेशन आहे. त्यांनी या संस्थेची स्थापना सेवाभावी आणि परोपकारी कार्यासाठी केली होती. त्यानंतर त्यांनी चित्तिलापल्ली स्क्वेअर नावाचा प्रकल्प पुर्ण करण्याचा निर्णय घेतला होता.

सध्या त्यांचे समाजकार्याचे काम चांगलेच सुरु आहे. त्यांनी शेअर्स विकून मिळवलेली रक्कम आता त्यांनी सुरु केलेल्या प्रकल्पासाठी वापरण्यास सुरुवात झाली आहे.

चित्तिलापल्ली यांचा उद्योगपती होण्याची गोष्टही खुप अनोखी आहे. वयाच्या २७ व्यावर्षी चित्तिलापल्ली यांनी त्यांच्या वडिलांकडून कर्ज घेऊन स्टेबिलायझर्स बनवण्याचा कारखाना सुरु केला होता.

चित्तिलापल्ली यांनी वडिलांकडून १ लाख रुपये कर्ज घेतले होते. तसेच दोन कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांनी हा कारखान्याला सुरुवात केली होती. आता वी-गार्ड ब्रँडसह स्टेबिलायझर्स विक्रित मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे.

आता ही कंपनी स्टेबिलायझर्ससोबतच इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रो-मेकिनिकल प्रॉडक्ट्स सुद्धा बनवते. सध्या वी-गार्ड स्टॉक मार्केटमधली लिस्टेड कंपनी आहे. या कंपनीची मार्केट कॅप आता सुमारे १० हजार कोटींच्या पुढे गेली आहे.

आता शेअर्स विकून मिळालेली रक्कम भागभांडवलाची रक्कम परोपकारी कामात वापरली जाणारी आहे. ज्या व्यवसायिकांना व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी निधीची आवश्यकचा असते, त्यांना ही रक्कम पुरवली जाणार आहे.

व्यवसायिकांना दिलेल्या निधीवर योग्य त्या दराने आणि अटींवर कर्ज देण्यासाठी त्यांनी के. चित्तिलापल्ली कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.