वडिलांचा त्रास सहन न झाल्याने शाळकरी मुलाने लढवली शक्कल अन् त्यातूनच उभारली करोडोंची कंपनी

0

मुंबईतील तिलक मेहता या मुलाने जे कार्य केले आहे ते वाचून तुम्हीही म्हणाल हा मुलगा बाकी मुलांपेक्षा वेगळा आहे. आपल्या वडिलांना होणारा त्रास त्याने पाहिला आणि तिलक याने पेपर्स ऍण्ड पार्सल्स नावाने कंपनी सुरू केली.

ही कंपनी लॉजिस्टिक्स कंपनी सुरू केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही तिलक मेहता अजुन लहान आहे आणि तो शाळेत जातो. त्याचे ध्येय आहे की २ वर्षात त्याला १०० करोड रुपये कमावयाचे आहेत.

ही कंपनी पार्सल आणि डिलिव्हरी देण्याचे काम करते. तिलक याने सांगितले की, मागील वर्षी त्याला काही पुस्तकांची खुप गरज होती. पण ती पुस्तके आणण्यासाठी खुप लांबचा पल्ला गाठावा लागत होता.

त्याच्या वडिलांना कामावरून आल्यानंतर त्याने पाहिले की ते खुप दमले आहेत. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांना पुस्तकांबाबत काहीच सांगितले नाहीत. असे दुसरे कोणीच नव्हते की तो त्यांना पुस्तके आणायला सांगू शकतो.

तेथेच त्याला बिझनेस करायची आयडिया सुचली. तिलक याने हा आयडिया एका बॅंकरला सांगितला. त्यांना त्याची आयडिया खुप आवडली आणि त्यांनी कंपनीमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

त्यांनी आधीची नोकरी सोडली आणि तिलकसोबत काम करण्यास सुरूवात केली. तिलकने पार्सल २४ तासांच्या आत ग्राहकाकडे पोहोचवण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांची मदत घेतली. पीएनएची सेवा पॅथोलॉजी लॅब, बुटीक शॉप आणि ब्रोकरेज कंपनीचे ग्राहक जास्तकरून वापरत आहेत.

आता त्याचे टार्गेट आहे की त्याला येत्या वर्षात १०० कोटी रूपये कमवायचे आहेत. लॉजिस्टीक मार्केटमध्ये त्याला आपली कंपनी २० टक्के पसरवायची आहे. पीएनए कंपनी आपले काम एका ऍप्लीकेशनच्या आधारे करत आहे.

कोरोना संकट यायच्या आधी या कंपनीत २०० कर्मचारी काम करत होते. या कंपनीला ३०० मुंबईचे डबेवाले जॉईन झाले आहेत. या डब्बेवाल्यांच्या आधारे कंपनी रोज १२०० पेक्षा जास्त पार्सल डिलीव्हरी करत आहे. ३ किलोपर्यंत पार्सल डिलीव्हरी करायची त्यांची मर्यादा होती.

डब्बेवाले एक पार्सल पोहोचवण्यासाठी ४० ते १८० रूपये पैसै घेतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.