गेम खेळून या ८ वर्षांच्या चिमुकल्याने कमावले २४ लाख रुपये, त्याची आई म्हणाली…

0

आधीच्या काळात मुले मैदानी खेळ खेळत असत पण आताच्या काळात जर तुम्ही पाहिले तर आता मुले तुम्हाला मैदानावर दिसणार नाहीत. सध्याची मुले मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळण्यात मग्न असतात.

ते जास्तीत जास्त वेळ व्हिडीओ गेम्स खेळण्यात घालवतात. आता याच कॉम्प्युटर गेममधून एक मुलाने २४ लाख रूपयांची कमाई केली आहे. केवळ ८ वर्षाच्या मुलाने हा कारनामा केला आहे.

या मुलाचे नाव आहे जोसेफ डीन. तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहतो. हा मुलगा फॉर्टनाईट गेम खेळणारा जगातील सर्वात लहान मुलगा आहे. या गेममधील त्याची लेव्हल बघता कंपनीने त्याला एक हाय स्पीड कॉम्प्युटर आणि २४ लाख रूपये सायनिंग बोनस दिला आहे.

जोसेफच्या आई वडिलांनी सांगितले की त्यांचा मुलगा चार वर्षांपासून होता तेव्हापासूनच हा गेम खेळत होता. त्यामुळे तो या गेममध्ये तरबेज झाला आहे. बीबीसीला मिळाळेल्या माहितीनुसार त्याच्या आईवडिलांना त्याच्या गेम खेळण्याबाबत काहीच अडचण नाहीये.

जोसेफची आई म्हणाली की, हा गेम थोडा हिंसक आहे. पण मला नाही वाटत यात काही चुकीचे आहे. त्या म्हणाल्या की, माझा मुलगा शाळेतून आल्यानंतर २ तास हा गेम खेळतो. वीकेंडला तो जास्तवेळ गेम खेळतो.

तो माझी परवानगी घेऊनच गेम खेळतो. त्याची आई पुढे म्हणाली की, जोसेफला मोठे होऊन मोठा गेमर व्हायचे आहे. कारण त्याला या क्षेत्रात जास्त इंटरेस्ट आहे. त्यांच्या मुलाच्या पैशाबाबत जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, त्याचे पैसै त्याच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात आले आहेत.

हे पैसै त्याच्याच भविष्यात कामाला येणार आहेत. ज्या काळात आई वडिल मुलांना गेम खेळण्यापासून ओरडतात त्या काळात या मुलाने गेम खेळून २४ लाख रूपये कमवून एक वेगळेच उदाहरण सर्वांसमोर उभे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.