‘या’ नियमाचे उल्लंघन केल्यास शिवाजी महाराज स्वता:च्याच मावळ्यांना द्यायचे शिक्षा

0

 

 

आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. महाराजांच्या स्वभावातील सहिष्णुता, दुरदृष्टी, करारीपणा आणि धाडसी वृत्ती ही सर्व त्यांच्यातील वैशिष्टये होती. आजही महाराजांच्या आयुष्यातील संघर्षातून लोक प्रेरणा घेत असतात.

शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजी महाराज लहानपणापासूनच प्रचंड हुशार होते. त्यांना युद्धाचे प्रशिक्षण आणि प्रशासन चालवण्याची समज दादोजी कोंडदेव यांच्याकडून मिळाली होती. ते महाराजांचे शिक्षक होते. चला तर मग जाणून घेऊया शिवाजी महाराजांबद्दलचे काही रोचक तथ्य…

१. शिवाजी महाराज हे खुप बुद्धिमान राजे होते. लोक जातीवरुन संघर्ष करायचे पण लोकांमधला हा संघर्ष त्यांना कधीही मान्य नव्हता. शिवाजी महाराज यांनी कधीही कोणत्याही धर्माला विरोध केला नव्हता.

२. असे म्हटले जाते कि शिवाजी महाराज यांचे नाव भगवान शिव यांच्या नावावरुन घेण्यात आले होते, पण तसे नाहीये. शिवाजी महाराज यांचे नाव एक क्षत्रिय देवता शिवाईच्या नावावरुन घेण्यात आले होते.

३. शिवाजी महाराज यांनी एक शक्तिशाली नौसेना निर्माण केली होती. त्यामुळे त्यांना ‘फादर ऑफ इंडियन नेवी’ म्हणूनही ओळखले जाते. कारण त्यांना माहित होते की नौसेनेमुळे डच, पौर्तुगीज आणि इंग्रज यांच्या आक्रमणापासून भारत सुरक्षित राहिल.

४. शिवाजी महाराज हे युद्धाची रणनिती बनवण्यात खुप माहिर होते. शिवाजी महाराज यांनी वयाच्या फक्त १५ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला होता. १६५५ पर्यंत त्यांनी एका पाठोपाठ कोंडण आणि राजगड जिंकला होता.

५. तुम्हाला हे माहितीये का बीजापुरला जिंकण्यासाठी शिवाजी महाराज औरंजेबाच्या मदतीला पुढे आले होते. पण तसे होऊ शकले नाही कारण अहमगनगरमध्ये मुघल क्षेत्रात दोन अधिकाऱ्यांनी छारा मारला होता.

६. शिवाजी महाराजच होते ज्यांनी मराठ्यांची खुप मोठे सैन्य तयार केले होते. मराठा सेनेच्या खुप तुकड्या होत्या. प्रत्येक तुकडीत २५ सैनिक होते. या सैन्यात भरती करताना हिंदू असो मुस्लिम दोघांनाही कोणताही भेदभाव न करता नियुक्त केले जायचे.

७. शिवाजी महाराज नेहमीच महिलांचा सन्मान करायचे. शिवाजी महाराजांनी सैनिकांना आदेश दिले होते की छापा टाकताना कोणत्याही महिलेला इजा पोहचता कामा नये. अशात जर कोणी या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला कठोर शिक्षा दिली जायची.

८. शिवाजी महाराजांचे एक वैशिष्ट्ये होते की ते आधी देशासाठी लढायचे त्यानंतर ते राज्यासाठी लढायचे. त्यांची नेहमीच अशी इच्छा होती सैनिकांनी कोणत्याही राजासाठी लढू नये तर त्यांनी देशासाठी लढावे. त्यासाठी ते सैनिकांना प्रोत्साहन सुद्धा द्यायचे.

Leave A Reply

Your email address will not be published.