आयपीएलमध्ये १.२० कोटींची बोली लागूनही हा खेळाडू आहे दुखी; कारण वाचून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

0

 

लवकरच आता क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण आता इंडीयन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलचा १४ सिजनच्या लिलावाचा पहिला टप्पा पार पडला आहे. या लिलावात क्रिकेट प्रेमींना अनेक आश्चर्याचे धक्के बसले आहे.

१८ फेब्रुवारीला झालेल्या लिलावात राजस्थान रॉयलने ८ खेळाडू खरेदी केले आहे. त्यात राजस्थानने ३ विदेशी खेळाडूंना खरेदी केले आहे. राजस्थानने १६.२५ कोटींची बोली लावून ख्रिस मॉरिसला खरेदी केले आहे, तो आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

राजस्थानने एका भारतीय गोलांदाजाला १.२० कोटींना खरेदी केले आहे. सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. हा गोलंदाज आहे चेतन सकारीया. चेतनची क्रिकेटर बनण्याची गोष्ट ही अनेकांना प्रेरणा देणारी आहे. आज आपण त्याच्याचबद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग…

चेतनने क्रिकेटर बनावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा नव्हती. पण त्याच्या काकांमुळे त्याला क्रिकेटर बनणे शक्य झाले आहे. चेतनची आधीची परिस्थिती खुप हालाकीची होती. ४-५ वर्षांपुर्वी तर त्यांच्या घरी टिव्हीसुद्धा नव्हता.

त्यामुळे क्रिकेट मॅच बघण्यासाठी तो कधीकधी मित्रांच्या घरी जायचा. इलेक्ट्रॉनिकच्या शॉरुमच्या बाहेरही तो अनेकदा मॅच बघत बसायचा. मागच्या महिन्यातच त्याच्या भावाने आत्महत्या केली होती. चेतनचा तो भाऊ त्याच्या खुप जवळ होता.

मला यंदाची आयपीएल खेळायला भेटणार आहे. १.२० कोटी रुपयांनी माझे आयुष्य पुर्ण बदलू शकते, पण तरीही मला खुप आनंद होत नाहीये. कारण माझा भाऊ माझ्या सोबत नाही जर आज तो माझ्यासोबत असता तर मला खुप आनंद झाला असता, असे चेतनने म्हटले आहे.

चेतनचे वडिल कांजीभाई हे टेम्पो चालक होते, जेव्हा चेतन एक चांगला गोलंदाज झाला तर त्याने आप्या वडिलांना हे काम सोडून देण्यास सांगितले होते. गेल्यावर्षी चेतन आरसीबीचा नेट गोलंदाज म्हणून युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी गेला होता. पण त्याची खेळण्यासाठी त्याची निवड झाली नव्हती. यंदा त्याला राजस्थानने आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.