मित्राला पैसै मिळावेत म्हणून स्वता इंग्रजांच्या ताब्यात गेले होते चंद्रशेखर, वाचा मैत्रीचा अनोखा किस्सा

0

देशातील महान क्रांतिकारकांचा विचार केला तर चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांची नावे सर्वात आधी लक्षात राहतात. त्यांच्या क्रांतीचे किस्से वाचले तर कोणाच्याही अंगावर काटा येईल. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल सांगायचे झाले तर स्वातंत्र्यालढ्याच्या काळात चंद्रशेखर यांचे नाव घेतले तरी इंग्रंज त्यांना घाबरायचे.

असे म्हणतात की जेव्हा त्यांना फाशी देण्यात आली होती तेव्हा त्यांच्या मृतदेहाच्या जवळ जाण्यासाठीसुद्धा इंग्रंज घाबरत होते. ते दूरवरुन आझादच्या मृतदेहावर गोळीबार करत होते. आज आम्ही चंद्रशेखर यांच्या मैत्रीचा एक किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा वाचून तुम्हालाही कळेल की खरी मैत्री काय असते.

काकोरीमध्ये कांड केल्यानंतर इंग्रज चंद्रशेखरच्या मागे हात धुवून लागले होते. सँडर्सची हत्या, काकोरीची घटना आणि असेंब्ली बॉम्बस्फोटानंतर आझाद झांसीमध्ये पळून आले होते. त्यांनी फरार असताना १० वर्षे झांसीमध्ये आणि इतर ठिकाणी आपले आयुष्य घालवले. याचदरम्यान, त्यांनी मास्टर रुद्रनारायण सक्सेना यांची भेट घेतली.

स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. चंद्रशेखर आझाद बरेच वर्षे त्यांच्या घरी राहिले. ब्रिटीशांपासून पळ काढण्यासाठी ते बर्‍याचदा एका खोलीच्या खाली एका गुप्त ठिकाणी लपून बसले (याला तळघर म्हणतात, आता ते बंद केले गेले आहे).

रुद्रनारायण एक क्रांतिकारक तसेच एक चांगले चित्रकार होते. त्यांनी एका हातात बंदूक आणि दुसर्‍या हाताला मिशी ठेवून चंद्रशेखर आझाद यांचे प्रसिद्ध पोर्ट्रेट चित्र काढले होते. रुद्रनारायण यांनी बराच काळ आझादला त्यांचे चित्र काढण्यासाठी आपल्यासोबत ठेवले होते. असे म्हणतात की इंग्रजांनी आझादला पाहिलेच नव्हते.

जेव्हा त्यांना या चित्राबद्दल कळले तेव्हा ते त्या चित्राच्या बदल्यात रूद्रनारायण यांना म्हणेल तेवढी रक्कम द्यायला तयार होते. आणखी एक चित्र होते ज्यामध्ये रूद्रनारायण आपल्या परिवारासोबत बसलेले होते. हा काळ होता जेव्हा रुद्रनारायण यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट होती. आझाद यांना हे पाहावले गेले नाही.

मिळालेल्या बक्षीस रकमेसह त्यांच्या मित्राचे घर चांगले चालू शकेल म्हणून त्यांनी इंग्रजांना शरण जाण्याचे मान्य केले. चंद्रशेखर आझाद यांची शैली आणि धैर्याचा वास अजूनही रूद्रनारायण यांच्या घरात आहे. तो पलंग आजही त्याच घरात आहे ज्यावर चंद्रशेखर बसायचे. चंद्रशेखर आझाद यांना भारतातील तरूणपीढी कधीही विसरणार नाही.

चंद्रशेखर आझाद हे आजच्या तरूण पिढीसाठी प्रेरणा आहेत. त्यांच्यासोबत राजगुरू आणि सुखदेव यांनीही आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. जर मैत्रीचे उत्तम उदाहरण पाहायचे असेल तर यापेक्षा उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.