चंद्रगुप्त मौर्य यांच्या प्रेमकहाणीत खलनायक बनले होते चाणक्य, लग्नाच्या बदल्यात ठेवल्या होत्या या अटी

0

चंद्रगुप्त मौर्य यांचे नाव ऐकल्यावर आपल्यासमोर अशा एका राजाची प्रतिमा उभी राहते ज्याने आपल्या शौर्याने आणि धैर्याने अशक्य गोष्टी शक्य केल्या होत्या. अशा योद्धाला आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी फक्त युक्तीची गरज होती. चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरू चाणक्य हे नेहमीच आपल्या शिश्याच्या हिताचा विचार करत असत.

त्यांनी ‘चाणक्य निती’ या पुस्तकात राज्य करण्यासाठी ज्या योजना आखल्या जातात याची संपुर्ण माहिती लिहीली आहे आणि चंद्रगुप्त मौर्य यांचे राज्य त्यांच्याच योजनांवर चालायचे. या सर्व बाबींच्या पलीकडे तुम्हाला माहिती आहे का? चंद्रगुप्त यांनी ग्रीक राजकन्या हेलेनाशी लग्न केले होते.

ऐतिहासिक कथेनुसार चंद्रगुप्त हे हेलेनाच्या प्रेमात पडले होते. पहिली पत्नी दुर्धाराची परवानगी मिळाल्यानंतर चंद्रगुप्त यांनी हेलेनाशी लग्न केले. ग्रीक राजे हेलिकस हे त्या काळचे खुप मोठे राजे होते. सेलेकस यांच्या सैन्याने चंद्रगुप्त मौर्यच्या सैन्याला ३०५ बीसी मध्ये भेट दिली, त्यानंतर त्यांनी चंद्रगुप्तच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती.

चंद्रगुप्त यांनी ग्रीक राजासमोर अशी अट घातली की जर युद्धात त्यांचा पराभव झाला आणि चंद्रगुप्त जिंकले तर ते राजकन्या हेलेनाशी लग्न करतील. युद्ध सुरू झाले आणि सेल्यूकस यांच्या सैन्यात ५०० हत्ती होते. तरीही मौर्य यांनी सेल्यूकसला हरवले. अशा प्रकारे त्यांनी प्रिन्सेस हेलेनाला जिंकण्यात यश मिळवले.

असे मानले जाते की राजकुमारी हेलेनाने यापूर्वीच आपले मन चंद्रगुप्तकडे दिले होते. राजकुमारीने चंद्रगुप्तच्या शौर्याबद्दल बरेच काही ऐकले होते. चंद्रगुप्त पहिल्यांदा जेव्हा सेल्यूकस राजाला भेटायला आले तेव्हा हेलेनाने चंद्रगुप्त यांना खिडकीतून पाहिले. त्यानंतर हेलेना त्यांच्या प्रेमात पडली होती.

तसेच चंद्रगुप्त यांनीही राजकन्याच्या सौंदर्याच्या किस्से ऐकले होते. चंद्रगुप्त मौर्य आपले गुरु चाणक्य यांचा खूप आदर करत असत, म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवला. चाणक्यला जेव्हा कळले की सम्राट चंद्रगुप्तला परदेशी मुलीशी लग्न करायचे आहे तेव्हा त्याने हेलेनासमोर तीन अटी ठेवल्या.

पहिली अट अशी होती की हेलेनापासून जन्मलेल्या मुलांना चंद्रगुप्तच्या राज्याचा वारसा मिळणार नाही. त्यांनी याचे कारण सांगताना सांगितले कीहेलेना ही परदेशी स्त्री आहे त्यामुळे तिला भारताच्या पुर्वजांबद्दल काहीही माहित नाही. तिचे भारताच्या पुर्वजांसोबत कसलेही नाते नाही. दुसरी अट अशी होती की, सम्राट अशोकाच्या राजवटीत ती कधीही हस्तक्षेप करणार नाही.

तिसरी अट अशी होती की, हेलेना विदेशी असल्यामुळे तिच्यावर कधीही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. याचे कारणही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की प्रत्येकाच्या मनात आपल्या देशाविषयी लपलेले थोडेतरी प्रेम असतेच त्यामुळे लग्नानंतर हेलेनाने तिच्या ग्रीक साम्राज्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही, अशा अटी चाणक्य यांनी हेलेना आणि चंद्रगुप्त यांच्यासमोर ठेवल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.