भारतात येण्याआधीच ‘या’ सेलीब्रिटींनी बाहेरून मागवल्या टेस्ला कार्स, किंमत पाहून शाॅक व्हाल

0

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भारतात कोणकोणत्या मोठ्या सेलिब्रिटींकडे किंवा उद्योगपतींकडे टेस्ला कार आहे. टेस्ला अजूनही भारतात लॉन्च झाली नाही पण लवकरच भारतात आपल्याला टेस्ला पाहायला मिळणार आहे.

टेस्लाचे पहिले शोरून बेंगलुरूमध्ये उभारण्यात येणार आहे. भारतात टेस्लाची पहिले कारचे मॉडेल टेस्ला मॉडेल ३ किंवा मॉडेल वाय असणार आहे. ही गाडी मार्चमध्ये भारतात येणार असल्याचे बोलले जात आहे.

या दोन्ही कार्समधील टेस्ला कोणती कार पहिल्यांदा लॉन्च करेल याची माहिती अद्याप मिळालेली नाही. देन्ही गाड्या या वर्षी भारतात लॉन्च होणार आहेत. यानंतर टेस्ला मॉडेल एस ही कार भारतात लॉन्च करणार आहे.

यानंतर टेस्लाची मॉडेल एक्स ही एसयुव्ही भारतात लॉन्च होणार आहे. या सर्व कार्स फॉरेनमधून मागवण्यात येणार आहेत त्यामुळे त्यांची किंमत खुप जास्त असणार आहे. जसे की अमेरिकेत टेस्ला मॉडेल ३ ची किंमत २७.५ लाख रूपये आहे.

पण भारतात तिची किंमत ७० ते ७५ लाख रूपये असणार आहे. भारतातील पहिली टेस्ला कार एसार कंपनीचे मालक प्रशांत रूहिया यांच्याकडे आहे. त्यांनी ही कार २०१७ मध्ये खरेदी केली होती. त्यांनी ही कार इंम्पोर्ट करून मागवली होती.

त्यावेळी त्यांनी ही कार २ कोटी रूपयांना विकत घेतली होती. हीच गाडी अमेरिकेत ६० लाख रूपयांपासून आपल्याला मिळेल. दुसरी टेस्ला गाडी भारतीय अभिनेत्री पुजा बात्रा हिच्याकडे आहे. तिच्याकडे टेस्ला मॉडेल ३ ही कार आहे.

त्यांनी ही गाडी कॅलिफोर्निया येथे विकत घेतली होती. पुजा ही गाडी कॅलिफोर्नियामध्येच चालवतात. या गाडीची किंमत तिकडे ३५ लाख रूपये आहे. तिसरी टेस्ला गाडी आहे ती म्हणजे रितेश देशमुखकडे. रितेशला ही टेस्ला मॉडेल एक्स कार त्याच्या बायकोने म्हणजे जेनेलियाने भेट दिली होती.

ही गाडीसुद्धा कॅलिफोर्नियामध्ये खरेदी करण्यात आली आहे आणि रितेश ही काय फक्त कॅलिफोर्नियामध्येच वापरतो. या गाडीची किंमत अमेरिकेच ६५ लाख रूपये आहे. भारतातील अनेक उद्योगपतींकडे टेस्ला कार्स आहेत.

सध्या पुर्ण भारतात टेस्लाची एकच मॉडेल एस गाडी आहे आणि ती म्हणजे मुकेश अंबानी यांच्याकडे. त्यांनी ही गाडी २०१९ मध्ये मागवली होती. त्यावेळी त्यांनी ही कार १.५ करोड रूपयांना घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी ही कार सेकंड हॅन्ड खरेदी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.