ना एक धाव, ना एक विकेट, तरी पठ्ठ्या ठरला ‘मॅन ऑफ द मॅच’

0

क्रिकेटमध्ये अनेकदा नवनवीन रेकॉर्ड बनवले जाता आणि ते ब्रेकही होत जातात. तसेच अनेकदा काही हटके घटनाही घडत असतात, ज्या घटनांची क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होते.

आजची हि घटना घडली होती, वेस्ट इंडीजच्या माजी खेळाडू आणि गोलंदाज कॅफरुन कफींसोबत. एका सामन्यात क कॅफरुनने एकही विकेट घेतली नव्हती, तसेच त्याने एकही धाव केली नसताना त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती.

क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच अशा खेळाडूला मिळतो, ज्याने सामन्यात काहीतरी उत्तम कामगिरी केली असेल. पण त्याने न काही करता त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, चला तर मग जाणून घेऊया नेमका काय किस्सा घडला होता.

२३ जून २००१ मध्ये वेस्ट इंडीजचा झिंबाब्वे विरोधात सामना होता. या सामन्यात झिंबाब्वेने टॉस जिंकला आणि वेस्ट इंडीजला फलंदाजी करण्यास सांगितले.

त्यावेळी विंडजने डॅरेन गंगा, ख्रिस गेल आणि शिवनारायण चंद्रपॉल यांच्या अर्धशतकीच्या मदतीने ५० ओव्हरमध्ये २६६ धावा केल्या होत्या आणि झिंबाब्वेला २६७ धावांचे लक्ष्य दिले होते.

गोलंदाजी करताना विंडीजने झिंबाब्वेची चांगलीच वाट लावली. कॅफरुनने १० ओव्हरमधल्या २ ओव्हर मेडन टाकल्या तर बाकीच्या ओव्हरमध्ये फक्त २० धावा दिल्या. दुसऱ्या गोलंदाजांनी १० ओव्हरमध्ये ३५ पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या.

या सामन्यात झिंबाब्वेला फक्त २३९ धावा करता आल्या आणि हा सामना विंडीजने जिंकला. बाकीच्या गोलंदाजापेक्षा कॅफरुनची गोलंदाजी भन्नाट झाली होती, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचने गौरविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.