आधी अनोळखी माणसाला किडनी दिली, आता विकले समाजासाठी कंपनीचे ९० कोटींचे शेअर्स

0

 

एखादा माणूस जर करोडपती असेल तर त्याच्याकडे बघण्याचा सामान्य माणसाचा दृष्टीकोन खुप वेगळा असतो. अरे हा खुप घमंडी असेल रे, असे म्हणत काही श्रीमंत लोकांकडे बघितले जाते, पण समाजात काही श्रीमंत लोक असेही आहेत जे श्रीमंतीचा कधीही गर्व न करता लोकांची मदत करत असतात.

आज आम्ही तुम्हाला अशा माणसाची गोष्ट सांगणार आहोत ज्या माणसाने एका अनोळखी माणसाला चक्क स्वत:ची किडनी दान केली आहे, या माणसाचे नाव चित्तिलापिल्ली असे आहे. चित्तिलापिल्ली हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते नेहमीच समाजसेवा करताना दिसून येत असतात.

२०११ मध्ये चित्तिलापल्ली यांनी एका अनोळखी ड्रायव्हरला स्वत:ची किडनी दान केली होती. त्यावेळी चित्तिलापिल्ली हे ६० वर्षांचे होणार होते.

६० वर्षांचे वय असताना ते कोचीच्या एका दवाखान्यात गेले होते आणि त्यांनी एका अनोळखी माणसाला किडनी दान केली होती. त्यांची ही किडनी डोनेशनसाठी होणारी सर्जरी ४ तास चालली होती.

त्यावेळी रुग्णाची पत्नीही किडनी देण्यासाठी तयार झाली होती, पण तिची किडनी मॅन नव्हती होत. तेव्हा चित्तिलापिल्ली यांनी कुठलाही विचार न करता किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्या रुग्णाला किडनी दान केली.

चित्तिलापिल्ली इलेक्ट्रीक अप्लायंस मॅन्युफॅक्चरर वी-गार्ड कंपनीचे प्रोमोटर आहे. ते नेहमीच समाजसेवा करत असतात. त्यासाठी त्यांनी २०१२ मध्ये चित्तिलापिल्ली फाऊंडेशनची स्थापनाही केली होती.

दरवर्षी चित्तिलापिल्ली चित्तिलापिल्ली फाऊंडेशनमध्ये वार्षिक कमाईचा एक मोठा भाग दान करत असतात. २०१७ मध्ये तर त्यांनी १.२ मिलियन डॉलर दान केले होते.

चित्तिलापिल्ली यांचे शिक्षण केरळच्या गुरुवायुरच्या जवळ असणाऱ्या एका गावात झाले होते. चित्तिलापिल्ली हे एकूण ६ भाऊ- बहीण आहे. त्यांना लहानपणी संशोधक बनायचे होते, पण मोठे झाल्यावर ते एक व्यवसायिक झाले.

आज त्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती असातानाही ते समाजाला मदत करत असताना दिसत असातात. त्यांनी नुकतेच समाजकार्यासाठी त्यांच्या कंपनीचे ९० कोटींचे शेअर्स विकले होते. त्यांच्या या समाजसेवेमुळे ते अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.