धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला आला हृदयविकाराचा झटका; मृत्यूपूर्वी त्याने वाचवले ३५ जणांचे जीव

0

 

अनेक लोक जग सोडून जाताना दुसऱ्या लोकांना आपले अवयव देऊन जीवनदान देत असतात. पण अचानक मृत्यूने गाठले असताना दुसऱ्यांना जीवनदान देणे अशक्यच आहे. पण अशीच एक घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे.

धावत्या बसमध्ये एका बस ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला, पण त्याआधी ब्रेक मारून त्याने बस थांबवली होती आणि अशाप्रकारे त्याने ३५ लोकांचे जीव वाचवले आहे. या माणसाचे नाव श्यामलाल असे आहे.

हिमाचल प्रदेश परिवहन निगममध्ये श्यामलाल बस ड्रायव्हरचे काम करायचे. झाले असे की मंगळवारी नेहमीप्रमाणे श्यामलाल आपल्या ड्युटीला हजर झाले.

तेव्हा त्यांना सरकाघाटवरून अवाहदेवीला जाणाऱ्या बसची ड्युटी लागली होती. त्यांनी बस सुरू केली आणि ते चालवू लागले.

जेव्हा बस सधोट गावाजवळ पोहचली तेव्हा त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांनी लगेच ओरडून प्रवाशांना सावध केले. त्यावेळी बसमध्ये ३५ प्रवाशी होती. सर्व प्रवासी सावध झाले.

पुढे श्यामलाल यांनी ओरडून प्रवाशांना बसच्या खाली उतरण्यास सांगितले आणि तेवढ्यात ते स्टेरिंगवर बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अशाप्रकारे श्यामलाल यांनी जग सोडून जाताना ३५ लोकांचे जीव वाचवले आहे. श्यामलाल यांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना होण्यासपासून टळली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.