एका डोकेदुखीच्या गोळीने झाले होते ब्रुसलीचे निधन, वाचा त्याच्याबद्दल काही रोमांचक गोष्टी

0

असे म्हणतात की ब्रुसली सारखा माणुस या जगतामध्ये कोणीच नाही आणि पुन्हा जन्म घेऊही शकणार नाही. त्याला मार्शल आर्ट्सचा बादशहा म्हणून लोक ओळखत असत. ब्रुसलीचा जन्म १९४० मध्ये चीनच्या फ्रान्सिस्को येथे झाला होता.

ब्रुसलीची ओळख म्हणजे त्याची ऍक्शन, स्टंट्स आणि मार्शल आर्ट. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ब्रुसलीने फक्त सात हॉलिवूड सिनेमे केले होते. यातील तीन सिनेमे त्याच्या मृत्युनंतर प्रदर्शित झाले होते.

पण आजही त्याचे सिनेमे लोक आवडीने पाहतात आणि मृत्युनंतरही त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. आजही त्याची कमतरता अनेक जणांना भासते. आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

त्याने वयाच्या ३२ वर्षी जगाचा निरोप घेतला होता. ब्रुसलीने १८ वर्षांचा होईपर्यंत तब्बल २० सिनेमांमध्ये काम केले होते. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने वॉग्शिंग्टन विद्यापिठात शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता पण त्याच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते.

म्हणून त्याने कुंग फू शिकवायला सुरूवात केली होती. १९६२ मध्ये त्याने एका फाईटमध्ये विरोधकाला फक्त ११ सेकंदात १५ पंच मारले होते. ब्रुसलीसोबत ज्या कलाकारांनी काम केले त्यातील बरेच कलाकार आज मोठे स्टार आहेत.

जसे की जॅकी चॅन, चक नॉरीस, सॅमो हंग. त्यामध्ये गामा पैलवान आणि बॉक्सर मोहम्मद अली यांचाही समावेश होता. ली इतका वेगवान होता की तीन फुटांवरून हल्ला करण्यासाठी त्याला फक्त ०.०५ सेकंद लागायचे.

तुम्हाला कदाचित माहित नसेल तो दोन बोटांनी पुशअप्स मारायचा. ब्रुसलीचे डोळे मात्र कमकुवत होते. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणारा तो जगातील पहिला व्यक्ती होता. पण नंतर त्याने ते काढून टाकले. १९५९ मध्ये त्याने मार्शल आर्ट्सची शाळा सुरू केली.

तेथे तो त्याने विकसित केलेलं कुंग फू शिकवायचा. ब्रुसली स्टीलच्या डब्याला एका फटक्यात होल पाडायचा. हॉलिवूडच्या हॉल ऑफ फेममध्ये त्याचा फोटो आहे. ब्रुसलीचा मृत्यु खुप दुखद झाला होता.

वयाच्या ३२ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला होता. तसे म्हणायचे झाले तर तो खुप तंदरूस्त आणि निरोगी होता. त्यावेळी त्याला जगातला सगळ्यात मोठा कुंग फू मास्टर लोक म्हणायचे. पण एका एलर्जिक रिऍक्शमुळे त्याचा मृत्यु झाला होता.

जेव्हा त्याचा मृत्यु झाला तेव्हा तो आपल्या मित्राच्या घरी होता. तो एका नवीन सिनेमावर काम करत होता. अचानक त्याचे डोके दुखू लागले. यासाठी त्याने डोकेदुखीची गोळी घेतली. त्याच्या मेंदूला सुज आली होती.

नंतर तो काहीवेळासाठी झोपी गेला तो परत कधीच उठला नाही. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल पण हे खरे आहे. त्याच्या मृत्युनंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता. आजही लोक त्याची आठवण काढतात.

कारण त्याच्यासारखा दुसरा व्यक्ती आजही या जगात नाही. त्याच्या नावावर आजही अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत जे कोणालाही मोडता आलेले नाहीत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.