छबीदार छबी नाही हा तर छब्या, मेकअपच्या टिप्स देऊन हा छब्या कमावतोय लाखो

0

मेकअप करणे, लिपस्टीक लावणे, मोठे केस वाढवणे ही मुलींची कामे असतात. अशा गोष्टी एका मुलाने करणे चुकीचे असते. पण एका १२ वर्षांच्या मुलाने हा कारनामा केला आहे. त्याला पाहून मुलीही लाजतील इतका सुंदर तो मुलींच्या वेशात दिसतो.

हा १२ वर्षांचा मुलगा मुलींना ब्युटी आणि ड्रेसिंग टीप्स देत असतो. त्याने असं काही केले आहे की त्याच्यासमोर मोठमोठे स्टायलिस्ट पाणी कम चाय आहेत. त्याने आपल्या आवडीलाच आपला बिझनेस बनवला आहे.

तो नेहमी आपल्या आईला मेकअप करताना बघायचा. तो मुळचा थायलंडचा रहिवासी आहे. त्याला लहानपणापासूनच मेकअप करण्याची आवड होती. नेस असे त्याचे नाव असून त्याला त्याच्या आई वडिलांनी कधीही अडवले नाही.

त्याला जे करायचं आहे ते त्याला करून दिले. त्याची आवड पाहून त्यांनी त्याचा सपोर्ट केला. आज तो त्याच्या ड्रेसिंग सेन्सपासून आणि ब्युटी टिप्सपर्यंत सगळ्या गोष्टी जगाला सांगत आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत.

त्याचे मुलींच्या वेशातील फोटो जर पाहिले तर अनेकजण अवाक होतात. कोणालाही कळत नाही की तो एक मुलगा आहे. तो इन्स्टाग्रामवर मेकअप आणि ड्रेसिंग ट्यूटोरिअल्स देत असतो. त्याची बोलण्याची स्टाईलसुद्धा एकदम प्रोफेशनल आहे.

त्याने त्याच्या होणाऱ्या कमाईतून आई वडिलांसाठी एक घर खरेदी केले आहे. नेस फक्त इन्स्टाग्रामवर टिप्स देतो असे नाही तर तो प्रोफेशनल डील्स आणि जाहिरातीही करतो. अनेक मोठ्या कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला आहे.

त्याच्या या कामावर काही लोक टिका करतात पण त्याला काहीही फरक पडत नाही. केवळ १२ वर्षांच्या वयात या मुलाने एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे. थायलंडच्या बाहेरही तो अनेक लोकांना मेकअपच्या टिप्स देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.