सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडली भन्नाट आयडिया, आता करतोय लाखोंची कमाई

0

अनेकदा आपल्याला काही गोष्टी अशा सापडतात की आपल्याला कल्पनाच नसते की या गोष्टींमुळे आपले आयुष्य बदलून जाईल. काही करण्याची जिद्द असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. आज अशाच एका तरुणाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपण सगळेच सोशल मीडियावर आपल्या दिवसातला बराचसा वेळ घालवतो पण एका तरुणाला याच सोशल मीडियावर कमाईचा मार्ग सापडला आहे. या तरुणाचे नाव आहे मयूर ज्ञानेश्वर गावंडे. त्याने बी ई मॅकेनिकलची पदवी घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले.

त्याच्या घरचे शेती करून घर चालवत होते. त्याने सर्वात आधी पुण्यातील एका कंपनीत क्वालिटी इंजिनिअर या पदावर दोन वर्षे नोकरी केली. पण लॉकडाऊनमुळे त्याचे काम बंद झाले आणि त्याने गावाकडे जाऊन काहितरी करण्याचा निर्णय घेतला.

अशातच त्याला सोशल मीडियावर सर्च करताना एक उद्योग सुरू करण्याची कल्पना आली. त्याने ही कल्पना घरच्यांना सांगितली आणि घरच्यांनीही त्याला होकार दिला. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याने अनुभवी लोकांची मदत घेतली. त्यातून त्याला प्रेरणा मिळाली.

त्याने विविध बँकांकडून कर्जाची मागणी केली पण त्याला कर्ज भेटत नव्हते. मग त्याने घरच्यांकडे असलेल्या रकमेने कामाला सुरुवात केली. २०२० मध्ये त्याने उद्योगाला सुरुवात केली आणि त्याने नाव ठेवले माऊली प्रॉडक्ट्स.

त्याने कच्चा माल घरीच आणला आणि उत्पादन बनवायला सुरुवात केली. यानंतर त्याने आपल्या भावासोबतच मार्केटिंग करण्यास सुरुवात केली. पण त्याला यामध्ये जास्त यश मिळत नव्हते.

आता सध्या बऱ्याच जिल्ह्यात त्याचा हा माऊली ब्रँड पोहोचला आहे. मयूरचा भाऊ प्रवीण गावंडे म्हणाला की, नवीन व्यवसाय सुरू करण्याचा मयुरचा विचार होता. आम्हाला त्याची कल्पना पटली.

बाजारात काय विकले जाऊ शकते? याचा विचार आम्ही केला आणि नंतर कापूर तयार करण्याचा निर्णय घेतला. यानंतर साहित्य खरेदी करून घरीच उत्पादन करण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला आम्हाला ३ ते ४ महिन्यात १८ लाखांपर्यंत नफा झाला आहे, असे प्रवीण म्हणाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.