लहानपणी वडील वारले, आईने शिवणकाम करून पोराला शिकवले, मुलाने IES होऊन नाव मोठं केलं

0

जर जिद्द असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्कीच तुम्हाला यश मिळते. अडचणींवर मात करून मिळवलेल्या यशाचा आनंदच वेगळा असतो. तुम्ही अनेक अधिकाऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज ऐकल्या असतील पण ही कथा जरा वेगळी आहे.

वडीलांच्या निधनानंतर दिवसरात्र मुलाच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या आईसाठी जर मुलाने यशाचे शिखर गाठले तर त्याचा आनंदही वेगळाच असतो. त्याचे मोल अनमोल आहे. अशीच एका मुलाची कथा आहे ज्याचे नाव आहे तन्मय महाजन.

तन्मयचे वडील लहाणपणीच वारले. त्याच्या आईने सर्व घराची जबाबदारी उचलली होती. त्याच्या आईने दिवसरात्र शिवणकाम करून त्याला शिकवले. घर चालवण्यासाठी त्यांनी कपडे शिवले.

त्यांनी आपल्या दोन्ही मुलासाठी कधीच कोणासमोर हात पसरले नाहीत. तन्मय लहानपणापासूनच हुशार होता. तन्मयने २०१९ मध्ये पंजाब इंजिनिअरींग कॉलेजमधून इंजिनिअरींग पुर्ण केले.

त्यानंतर त्याने युपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले होते. त्याने इंजिनीअरींग सर्विसेसमध्ये ६४ वा रॅंक मिळवला. आता तो IES अधिकारी बनला आहे. तन्मयने GATE परीक्षेतही आठवा रॅंक मिळवला आहे.

त्याच्या या यशात त्याची आई विपिन गुप्ता यांचा खुप मोठा हात आहे. तन्मयचे वडील लहाणपणीच वारले होते. त्यानंतर त्याच्या आईनेच सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.

आईने शिवणकाम केले. त्यातुन मिळणाऱ्या पैशातून पोटपाणी चालत होते तसेच तन्मयच्या शिक्षणाचा खर्च निघत होता. तन्मय हुशार होता त्यामुळे त्याने इंजिनीअर व्हावे अशी त्याच्या आईची इच्छा होती.

तन्मयने सिव्हील इंजिनीअरींगचा अभ्यास करताना गेट आणि इंजिनिअरींगचाही अभ्यास चालू ठेवला होता. शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्याने आपल्या आईलाही मदत केली.

तो आईला हातभार लावण्यासाठी एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जात असे. हे यश संपादन करण्यासाठी तन्मयलाही खुप कष्ट करावे लागले आहेत. तन्मयची मोठी बहीणसुद्धा त्याच्यामागे खंबीर उभी राहिली होती.

तन्मयची पोस्टींग लवकरच होणार आहे. देशसेवा करणे हेच त्याचे ध्येय आहे. अभ्यास, सातत्य, मेहनत हे त्याच्या यशाचे सिक्रेट आहे असे त्याने सांगितले. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.