नेत्रहीन असून या मुलीने पटकावले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके; एकदा वाचाच…

0

स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची नाही तर मनात जिद्द असण्याची गरज असते, हे अनेक नेत्रहीन लोकांनी सिद्ध करून दाखवले आहे. अशा लोकांच्या यादीतलेच एक नाव आहे ते म्हणजे सरिता चौरे. नेत्रहीन असूनही आपल्या जिद्दीच्या जोरावर जुडोमध्ये तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहे.

मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये राहणारी सरिता लहानपणापासूनच नेत्रहीन आहे. तिला सहा भाऊबहिन आहेत. ती एक मध्यमवर्गीय कुटुंबातुन येते, तिचे वडील हातमजुरीचे काम करतात.

आर्थिक परिस्थिती नीट नव्हती पण मुलींचे भविष्य बघता तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या बहिणींना इंदोरमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवले. सरिताला लहानपणापासूनच जुडो खेळायची खूप आवड होती.

जेव्हा तिला कळले की होशंगाबादच्या सुहागपूर गावात एक समाजसेवी संस्था नेत्रहीन मुलांना जुडो शिकवते, तेव्हा ती तिथे गेली आणि तिने जुडो शिकण्यास सुरुवात केली.

२०१७ पासून सरिताने जुडो खेळण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला हा खेळ खेळण्यास कठीण जात होता, पण कोचच्या मार्गदर्शनाने सरिता शिकत गेली.

२०१७ ते २०१८ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेच्या एका शिबिरात निवडण्यासाठी सरिताने नियमितपणे घरीच सराव केला होता. तिने २०१८ मध्ये ४४ किलोच्या ज्युनियर वर्गात राष्ट्रीय ब्लाइंड आणि पॅरा जुडो चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

२०१९ मध्ये पण तिने इंग्लंडमध्ये असणाऱ्या  कॉमनवेल्थ जुडो चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्य पदक जिंकले होते. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबाकडे तिला इंग्लंडला पाठवण्यासाठी सव्वालाख रुपये नव्हते. त्यामुळे  गावातील लोकांनी मदत तिला इंग्लंडला जाण्यासाठी निधी पुरवला होता.

सध्या सरिता बीएच्या शिक्षणासोबतच जुडोची प्रॅक्टिस पण करत असते. पुढे तिला एमएचे शिक्षण घ्यायचे आहे. तसेच सारिताला पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची इच्छा आहे. २०२४ च्या ग्रीष्मकालीन ऑलम्पिकची तयारी पण ती करत आहे.

आयुष्यात काही असते काही नसते, पण आपण हार मानायची नसते. आयुष्यात संघर्ष हा असतोच पण त्याच्याशिवाय माणसाला यश मिळवणे कठीणच आहे, असे सरिता म्हणते. नेत्रहीन असून जगाच्या पाठीवर भारताचे नाव मोठे करणारी सरिताची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.