पाण्यावर चालणारी बाईक आता रस्त्यावर धावणार; अकोल्याच्या पाच विद्यार्थ्यांनी तयार केली भन्नाट बाईक

0

 

दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढताना दिसून येत आहे. सर्वसामान्य लोकांना आता हे भाव परवडणार नाही असे लक्षात येत आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता इलेक्ट्रीक गाड्यांकडे वळले आहे.

अशात अकोल्याच्या पाच विद्यार्थ्यांनी खाऱ्या पाण्यावर चालणारी बाईक तयार केली आहे. कौलखेड परिसरात राहणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी हि बाईक तयार केली आहे. इंधनाचा खर्च वाचावा यासाठी या तरुणांनी हि बाईक बनवली आहे.

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचे नाव यश जायले, शंतनू झाकर्डे, अभिजीत धर्मेंद्र, मंदार किल्ले आणि महेश घाटे असे आहे. या बाईकचा पहिला ट्रायल ८ डिसेंबरला घेण्यात आला होता.

हि बाईक खाऱ्या पाण्यावर चालावी यासाठी विद्यार्थ्यांनी हायड्रोजन सेल तयार केला आहे. या बाईकचे इंजिनचे डिझाईन त्यांनी स्वता: तयार केले असून या बाईकचे इंजिन सामान्य इंजिनच्या तुलनेने जास्त शक्तिशाली आहे.

या बाईकचे इंजिन पेट्रोलच्या तुलनेत ३ पट जास्त वीज निर्मिती करण्याचे काम करतो. हायड्रोजचा उपयोग सामान्य इंजिनमध्ये केला जाऊ शकत नाही, त्यामुळे हायड्रोनमुळे कोणता धोका निर्माण होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले आहे.

हि बाईक हायड्रोजनवर चालते. या बाईकमध्ये लावलेल्या हायड्रोजन सेलमधून पाण्यातले हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जाते. या बाईकधून कार्बन तयार होत नसल्याने या बाईकपासून प्रदूषणही होत नाही.

१ लीटर खाऱ्या पाण्यात ४० किलोमीटर प्रतितास वेगाने ३ तास ही बाईक चालते. आम्ही आमच्या पॉकेटमनीधून या बाईकची निर्मिती केली आहे. जर आम्हाला सरकारकडून मदत मिळत असेल, तर आम्ही मोठ्या वाहनांमध्ये हा प्रयोग करु शकतो, असे त्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.