भाजपच्या ‘या’ आमदाराने आपल्या दुचाकीला लावला होता लाल दिवा, कारण ऐकून हैराण व्हाल..

0

 

एखादा नेता कुठेतरी जातोय म्हटलं तर त्याच्या चार-पाच भारीतल्या चारचाकी गाड्या डोळ्यासमोर येतात. नेत्याचे चारपाच अंगरक्षक, असे चित्र समोर येते. पण बिहारमध्ये असा एक आमदार आहे, जो एकेकाळी आपल्या दुचाकीला लाल दिवा लावून फिरायचा आणि रस्त्यावर असणाऱ्या गरजूंना मदत करायचा.

ही गोष्ट आहे, १९९० ची. बिहारचे सासारामचे नगरपालिकेचे कर्मचारी जवाहर प्रसाद भाजपच्या तिकिटावरून आमदार झाले. तेव्हा त्यांनी आपल्या राजदूतला लाल दिवा लावला. ते गावभर फिरायचे. फिरताना राजदूत स्वतः चालवायचे आणि मागे त्यांच्या बॉडिगार्डला बसवायचे.

रस्त्यात जाताजाता जर त्यांना कोणी गरजू व्यक्ती मिळाली तर जवाहर प्रसाद त्यांची मदत करायचे. तसेच जर कोणी वृद्ध किंवा आजारी व्यक्ती त्यांना रस्त्यावर दिसली तर जवाहर प्रसाद त्यांना रुग्णलयात किंवा त्यांच्या घरी घेऊन जायचे. तेव्हा आपल्यासोबतच्या बॉडिगार्डला गाडीवरून खाली उतरवायचे आणि स्वतः त्या व्यक्तीला घेऊन जायचे.

कार नसली म्हणून काय झालं त्यांनी आपल्या राजदूतलाच लाल दिवा लावला होता. त्यामुळे बिहारमध्ये त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती.

त्यांनी हा दिवा यामुळे लावला होता की नेता हा पण जनतेचाच एक भाग असतो, तो काही वेगळा नसतो. तेव्हा नेता आणि सामान्य जनतेतील दरी कमी करण्याचे काम जवाहर प्रसाद यांनी केले होते.

जवाहर प्रसाद हे आतापर्यंत पाच वेळा आमदार झालेले आहे. एकेकाळी ते नगरपालिकेत कर्मचारी म्हणून कामाला होते. त्यामुळे त्यांना चेयरमन किंवा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांची गाडी चालवावी लागायची.

तेव्हा त्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांना पिवळा दिवा असायचा. तसेच क्लास वनच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांना लाल दिवा लागायचा तर बीडीओ-सीओच्या गाड्यांना पिवळा दिवा लागायचा.

तेव्हा अधिकारी सामान्य जनतेला आपल्या दिव्याच्या गाडीने हिनवायचे आणि एका अधिकाऱ्यात आणि कर्मचऱ्यात फरक असतो हे दाखवण्याचे काम ते करायचे. ही गोष्ट जवाहर यांना आवडायची नाही.

जवाहर प्रसाद १९८९ मध्ये राजकारणात सक्रिय झाले. जेव्हा १९९० मध्ये निवडणूक झाली तेव्हा भाजपने त्यांना सासाराम या मतदार संघातून उभे केले. त्यावेळी त्यांना विश्वास बसत नव्हता की निवडणूक लढू शकतात. पण जनतेने त्यांना निवडून दिले आणि ते भाजपचे आमदार झाले.

जेव्हा जवाहर प्रसाद आमदार झाले तेव्हा घरची परिस्थिती अशी नव्हती की, ते एखादी कार घेऊ शकतील. तेव्हा त्यांना विधानसभेकडून कर्ज मिळत होते, मात्र त्यांनी ते घेतले नाही. जवाहर प्रसाद यांनी एक दुचाकी घेतली आणि त्यालाच लाल दिवा लावला.

जवाहर यांनी राजदूत जवळपास दहा वर्षे चालवली. ते नेहमीच जनतेच्या सेवेत होते. आपल्या दुचाकीवर लाल दिवा लावून त्यांना हा संदेश द्यायचा होता की, ते मोठमोठ्या नेत्यांचे गुलाम नाही तर जनेतेचे सेवक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.