मॅकेनिक इंजिनिअर ते बिहारचे मुख्यमंत्री; वाचा कसे बहरले नितीश कुमारांचे राजकारण

0

 

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे, यामुळे सगळ्यांचे लक्ष निकालाकडे लागून आहे. या निवडणुकीत मुख्य लढत सत्ताधारी एनडीए आणि आरजेडीच्या नेतृत्वात महाआघाडी यांच्यात आहे.

तसेच या निवडणुकीत आता नितीश कुमार आपली सत्ता राखणार की तेजस्वी यादव या बिहारचे मैदान मारणार अशा चर्चा असल्याने ही विधानसभा निवडणुक अटीतटीची बनली आहे.

तर आज जाणून घ्या नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आतापर्यंत सहा वेळा घेतली आहे.

३ मार्च २००० ते १० मार्च २००० पर्यंत, २४ नोव्हेंबर २००५ ते २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत, २६ नोव्हेंबर २०१० ते १९ मे २०१४ पर्यंत, तसेच २२ फेब्रुवारी २०१५ ते १९ नोव्हेंबर २०१५, तर २० नोव्हेंबर ते २०१७ आणि पुन्हा २०१७ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री अशी त्यांची बिहारच्या मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आहे.

नितीश कुमार यांचा जन्म बिहारमध्ये १९५१ मध्ये झाला होता. पुढे जाऊन ते बिहारमधील पटना इंजिनिअरिंग कॉलेजमधून  मॅकेनिक इंजिनिअर झाले. नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात १९७७ मध्ये झाली होती. मात्र पहिल्यांदा ते १९८५ विधानसभेमध्ये ते निवडून आले.

१९८७ मध्ये नितीश कुमार बिहार युवा लोकदलाचे अध्यक्ष बनले.  तर पुढे १९८९ मध्ये त्यांना जनता दलाचे महासचिव बनवण्यात आले. हे वर्ष त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी खूप महत्वाचे होते. कारण याच वर्षी त्यांची लोकसभेत निवड झाली.

१९९० मध्ये नितीश कुमार हे एप्रिल ते नोव्हेंबर कृषी व सहकार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होते. १९९१ सालच्या १० व्या लोकसभा निवडणुकीत ते पून्हा एकदा खासदार झाले. पुढे १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार पुन्हा निवडून आले.

१९९६ ते १९९८ पर्यंत ते नितीश कुमार रक्षा समितीचे सदस्य होते. १९९८ मध्ये झालेल्या १२ व्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा ते निवडून आले होते, तर १९९८ ते ९९ पर्यंत नितीश कुमार हे केंद्रीय रेल्वेमंत्री होते.

पुन्हा एकदा १३ व्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच १९९९ लोकसभा निवडणूकीत निवडून आले होते, त्यावर्षी ते केंद्रीय कृषिमंत्री देखील होते. २००० मध्ये ते पहिल्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. आता पुन्हा एकदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले तर ते सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

Leave A Reply

Your email address will not be published.