तीन वेळा मुख्यमंत्री होऊनही आज या माजी मुख्यमंत्र्यांची आजची पिढी करतेय मजुरी

0

एकदा का राजकारणात माणूस गेला तर त्याच्या सात पिढ्या बसून खातात, असे लोक म्हणतात. जर माणूस मुख्यमंत्री बनला असेल तर कदाचित आठवी पिढीचा विचारही करायची गरज नाही. मात्र बिहारचे एक असे मुख्यमंत्री होते ज्यांनी सन्मानावाशिवाय राजनीतीमध्ये काहीच मिळवले नाही.

बिहारचे माजी मुख्यमंत्री भोला पासवान शास्त्री यांची ही गोष्ट. शास्त्री हे आतापर्यंत तीनवेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहे. तसेच ते बिहारचे पहिले दलित मुख्यमंत्री होते. मात्र तरीही आज त्यांच्या पिढ्या गावात मजुरी करून पैसा कमवत आहे.

भोला पासवान शास्त्री यांचा जन्म बिहारच्या बैरगच्छी या गावात २१ सप्टेंबर १९१४ मध्ये झाला होता. शास्त्री हे खूप इमानदार आणि देशभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. बीएचयुमध्ये डिग्री मिळाल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते.

शास्त्री हे महात्मा गांधी यांच्याशी खूप प्रभावित होते. शास्त्री हे दलित परिवारातले होते तसेच त्यांची घरची परिस्थिती खूप गरीब होती. असे असतानाही ते खूप हुशार नेता होते.

१९६७ मध्ये भोला पासवान शास्त्री हे पहिल्यांदाच कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. हा तो काळ जेव्हा पक्षांमधील मतभेदांमुळे तीन बिगर-कॉंग्रेसी मुख्यमंत्र्यांनी आपले पद गमावले होते.

पुढे काँग्रेसने पासवान यांना दलित नेता म्हणून उभे केले आणि २२ मार्च १९६८ रोजी ते मुख्यमंत्री झाले, पण हे युती सरकार फार काळ टिकू शकले नाही आणि तीन महिन्यांनंतर भोला पासवान शास्त्री यांचे मुख्यमंत्री पद गेले.

पुढे ते दोनदा मुख्यमंत्री बनले. जून १९६९ ते जुलै १९६९ तसेच जून १९७१ ते जानेवारी १९७२ या काळात ते बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारसोबत त्यांची दिल्लीच्या राजकारणावरही मजबूत पकड होती.

१९७३ ला इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रीयमंत्री बनवण्यात आले होते. शास्त्री हे एक असे नेते होते जे एखाद्या झाडाखालीही बसायचे. ते सतरंजी टाकून बसायचे. अनेक बैठका ते अधिकाऱ्यांसोबत असेच बसून घ्यायचे. त्यांचे राहणीमानदेखील सामान्य होते.

काही काळानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला होता. अखेर ९ सप्टेंबर १९८४ ला बिहारच्या या दिग्गज नेत्याचे निधन झाले. इतके वर्षे राजकारणात असूनही त्यांनी पैसा कमावला नाही. त्यांची राजकारणातली इमानदारी इतकी होती की, मृत्यूनंतर त्यांचे श्राद्ध घालण्यासाठीदेखील त्यांच्या खात्यात पैसे नव्हते.

भोला पासवान शास्त्री यांचे निधन पटना येथे झाले होते. मुलगा नसल्याने अंतिम संस्कार भाच्याच्या हाताने करण्यात आला होता. शास्त्री हे विवाहित होते, मात्र त्यांची पत्नी त्यांच्यापासून वेगळी झालेली होती.

सरकारकडून शास्त्री यांच्या कुटुंबाला इंदिरा आवास मिळाले आहे. खरं तर शास्त्री यांच्या कुटुंबाने काही मागितले नव्हते पण कोरोना संकटात केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले होते. माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाची ही परिस्थिती जेव्हा नेते तेजस्वी यादव यांनी कळली तेव्हा त्यांनी या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.