सलाम! एकाच कुटुंबातील या सहा मुली आहेत पोलिस दलात

0

 

पोलिस बनून देशाची सेवा करणे अनेक तरुण तरुणींचे स्वप्न असते, आज आम्ही तुम्हाला अशा कुटुंबाबद्दल सांगणार आहोत ज्या कुटुंबातील सहा मुली पोलिस दलात असून देशाची सेवा करत आहे.

पन्हाळा तालुक्यात राहणाऱ्या या सहा मुली वाघवे कुटुंबातील आहे. एकाच कुटुंबातील सहा मुली पोलिस दलात कार्यरत असल्याने सगळीकडेच हा कौतुकाचा विषय ठरत आहे. तसेच पुर्ण राज्यात या मुली कौतुकाचा विषय बनल्या आहे.

खोतवाडी परिसरात सुरेश भोसले, प्रकाश भोसले आणि चंद्रकांत भोसले हे तिघे भाऊ राहतात. यामध्ये सुरेश भोसले यांना चार मुली आणि दोन मुली आहे, तर चंद्रकांत यांना तीन मुली आहे. या भावांमध्ये प्रकाश भोसले हे कोल्हापुरात राहत आहे. तर सुरेश आणि चंद्रकांत हे गावातच राहतात. या दोन्ही भावांच्या सहा मुली पोलिस खात्यात आहे.

सुरेश भोसले यांच्या मुली सारीका, सुवर्णा, आणि सुजाता या तिन्ही मुली पोलिस दलात कार्यरत आहे, तर त्यांचा लहान भाऊ सोमनाथ हा पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत आहे.

चंद्रकांत भोसले यांच्याही तीन मुली पोलिस दलात आहे. त्यामध्ये रुपाली, सोनाली आणि विमल असे त्यांची नावे आहे. सहा मुलींमध्ये सुवर्णा, सुजाता, रुपाली, सोनाली, विमल या पाच मुलींचा विवाह झाला आहे, तर सारीका ही सध्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात कार्यरत आहे.

सुवर्णा या सध्या कोल्हापुरातील पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत आहे. सुजाता या अलिबाग-रायगड पोलिस अधिक्षक कार्यालयात, तसेच रुपाली या नाशिक शहर पोलिसात, सोनाली राजवाडा पोलिस ठाणे कोल्हापुर, तर विमल या कोल्हापुर वाहतूक शाखेत कार्यरत आहे.

या सहाही मुलींना पोलिस दलात भरती होण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला होता. खुप संघर्ष केल्यानंतर त्या पोलिस दलात कार्यरत झाल्या आहे, जेव्हा त्या शाळेचे शिक्षण घेत होत्या, तेव्हा त्यांना दोन किलोमीटर पायी चालत जावे लागायचे. शेताच्या बांधातून त्यांना जावे, त्यामुळे पावसाळ्यात त्यांना गुडघाभर चिखलातून त्यांना शाळेत जावे लागायचे.

एकाच कुटुंबातील सहा मुली पोलिस दलात असल्याने राज्यभरात त्यांचे कौतूक केले जात आहे. अशात, मुलींना हवे तितके शिकू द्या. त्यांना ज्या क्षेत्रात जायचे त्या क्षेत्रात जाऊद्या, त्या नक्कीच यशस्वी होऊन दाखवतील, असे त्या मुलींच्या आई-वडिलांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.