शॉर्ट्स घालून ट्रेनिंग करायची तेव्हा लोकांनी मारले टोमणे; आता तीच मुलगी करतेय टोकियोमध्ये भारताचे नेतृत्व

0

 

भावना जाटला २०२१ मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रेसवॉकिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. इतक्या उंच पातळीवर प्रतिनिधित्व करणाऱ्या भावनाचे आतापर्यंतचे आयुष्य खुप संघर्षात गेले होते.

भावनाने आपल्या गरीब परिस्थितीवर आणि लोकांच्या टोमण्यांना मात करुन इथपर्यंतची मजल मारली आहे, तिच्या जिद्दीची गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. चला तर मग जाणून घेऊया तिची प्रेरणादायी गोष्ट…

राजस्थानच्या जयपुरमधल्या काबडा गावात राहणारी भावनाची परिस्थिती खुप गरीबीची होती. तिच्या वडिलांकडे २ एकर जागा होती. भावनाला लहानपणापासूनच आपल्या परिस्थिची जाणीव होती. त्यामुळे तिला आयुष्यात लवकरात लवकर यशस्वी व्हायचे होते.

एकदा ती जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेली होती. तिथे फक्त रेसवॉकिंगसाठीच एक जागा शिल्लक होती. भावनाने त्यामध्ये भाग घेतला आणि तिथूनच तिच्या रेसवॉकिंगच्या करियरला सुरुवात झाली.

ट्रेनिंग करण्यासाठी ती सकाळी खुप लवकर उठायची आणि गावातील लोक जागे होण्याआधी शेतात जाऊन ट्रेनिंग करायची. ज्यामुळे लोक पाहू नाही शकणार. कारण शॉर्ट्स घालून प्रॅक्टीस केल्याने त्यागावातील लोक तिला टोमणे मारायचे.

समाजाच्या दबावानंतरही तिच्या कुटूंबाने तिची साथ सोडली नाही आणि भावनाला नेहमीच पाठिंबा दिला. तिच्या मोठ्या भावाने कॉलेज सोडून नोकरी सुरु केली ज्यामुळे भावनाला रेसवॉकींगमध्ये करियर करण्यास मदत होईल.

२०१९ मध्ये ऑल इंडीया रेल्वे प्रतियोगितेत रेसवॉकींगच्या २० किलोमीटरच्या स्पर्धेत तिने भाग घेतला होता. तेव्हा तिला गोल्ड मेडल मिळाले होते. २० किलोमीटरचे अंतर तिने १ तास ३६ मिनिट आणि १७ सेकंदात पुर्ण केले होते. यास्पर्धेमुळे तिचा आत्मविश्वास प्रचंड वाढला.

रांचीमध्ये झालेल्या २०२० मध्ये झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिने एक नवीन रेकॉर्ड बनवला होता. भावनाने २० किलोमीटरचे अंतर १ तास २९ मिनिट आणि ५४ सेकंदात पार केले होते, या रेकॉर्डमुळेच ती टोकियो ऑलिम्पिकसाठी २० किलोमीटरच्या रेसवॉकींगमध्ये निवड झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.