जेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, मी अविवाहीत आहे, पण कुंवारा नाही…

0

 

 

आज भारतरत्न पुरस्कारप्राप्त आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. अटल बिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान झालेले आहे.

वाजपेयी सुरुवातीला दोनदा पंतप्रधान बनले होते, तेव्हा त्यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ खुप छोटा होता. एकदा ते १३ महिन्यांसाठी पंतप्रधान बनले होते, तर एकदा ते १३ दिवसच पंतप्रधानपदावर होते.

१९९९ मध्ये जेव्हा ते तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनले, तेव्हा त्यांनी २००४ पर्यंतचा पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला होता. अटल बिहारी वाजपेयी नेहमीच आपल्या हजरजबाबासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या हजरजबाबाचे अनेक किस्से आहेत.

त्यांच्या हजरजबाबीपणामुळे वाजपेयी अनेकांची बोलती बंद करायचे. आजचा हा किस्सा असाच आहे जेव्हा त्यांनी एका पत्रकाराची बोलती बंद केली होती. मी अविवाहीत आहे, पण कुंवारा नाही असे वाजपेयी यांनी म्हटले होते.

जेव्हा एखादी मोठी व्यक्ती अविवाहीत असते, तेव्हा सर्वांना त्याचे कुतुहल वाटते. अटल बिहारी यांनी आयुष्यभर लग्न नाही केले. त्यामुळे अनेकदा त्यांना लग्न का नाही केले यावर प्रश्न विचारला जायचा, तेव्हा ते हसून टाळायचे.

एकदा एका पत्रकाराने त्यांना तुम्ही कुंवारे का आहे? असा प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी त्यांच्या हजरजबाबीपणामुळे सर्वांनाच दंग केले होते. मी अविवाहीत आहे, पण कुंवारा नाही, असे म्हणत वाजपेयी यांनी पत्रकाराची बोलती बंद केली होती.

त्यांचे असे अनेक किस्से आहे. एकदा पाकिस्तानच्या मंत्र्याने म्हटले होते की, काश्मीर पाकीस्तानशिवाय अर्धवट आहे. तेव्हा आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देत म्हणाले, पाकीस्तानशिवाय भारत अर्धवट आहे.

एकदा एका पत्रकाराने म्हटले होते, की भाजपात एक आडवाणीचा दल, एक वाजपेयीचा दल आहे. तेव्हा पण आपला हजरजबाब देत वाजपेयी म्हणाले होते, मी कोणत्याच दलदलमध्ये नाही. मी दुसऱ्यांच्या दलदलमध्ये आपले कमळ फुलवत असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.