‘त्या’ लोकांनी माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले तेव्हाच मी ठरवले की…; भरत जाधव झाला भावूक

0

 

अभिनेता भरत जाधवला मराठी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार म्हटले जाते. चित्रपट असो वा नाटक दोन्ही ठिकाणी तितक्याच ताकदीने काम करतो तो म्हणजे भरत जाधव.

सिनेमात येण्याआधी भरत सामान्य कुटुंबात जन्म घेणारा मुलगा होता. त्याचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. त्यामुळे भरत जाधवने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढं सगळं केलं.

मराठी चित्रपटसृष्टीत पहिली व्हॅनिटी घेणाऱ्या कलावंताचा मान भरत जाधवनेच मिळवला होता. भरत जाधवने फेसबुकवर आज एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये वडील टॅक्सीचालक असतानाच्या काळातला एक भावूक करणारा अनुभव लिहला आहे.

भरत जाधवने फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट अशी होती,
एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते. त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासा दरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते.

अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या पण वडिलांनी त्यांना एक अक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडले आणि शांतपणे निघून आले.

रात्री घरी आल्यानंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला..

ते प्रवासी ‘ऑल द बेस्ट’च्या प्रयोगाला चालले होते..!
आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत. या एकाच गोष्टीसाठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. खुप रडलो होतो त्या दिवशी.

सुदैवाने तेंव्हा मला १०० रुपये नाईट मिळत होती..

त्या दिवसापासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं. टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं, तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर ह्याच एखादं नाटक नाही चाललं तर काय करणार.

ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक Honda Accord घेतली आणि त्यांना स्टेअरिंगवर बसवलं त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं. त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या.. BMW, Mercedes S Class.

मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होत ते सगळं सुखं मी त्यांना देऊ शकलो. अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय.
आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.