६४ वय असतानाही ‘या’ आजी देताय शेअर मार्केटच्या टिप्स; एकदा वाचाच…

0

 

असे म्हणतात शिकण्याचे शिकवण्याचे कोणते वय नसते, याचे उत्तम उदाहरण आहे भाग्यश्री फाटक. भाग्यश्री फाटक यांना वयाच्या ६४ व्या वर्षी युट्युबवर प्रसिद्धी मिळाली आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रसिद्धीमागची गोष्ट…

ज्या वयात लोक निवृत्ती घेण्याच्या विचारात असतात, त्या वयात  या आजी लोकांना शेअर मार्केटच्या टिप्स देऊन प्रसिद्ध झाल्या आहे. आजींचे मराठीत ‘मार्केट आणि मी’ हे युट्युब चॅनेल आहे. आजी त्या चॅनेलवर रोज शेअर मार्केटच्या मराठीत टिप्स देत असतात.

२००० सालापासून आजी शेअर मार्केटमध्ये आल्या आहे. काही वर्षांनी त्या शेअर मार्केटमधल्या यशस्वी गुंतवणूकदार झाल्या. काही वर्षांपूर्वी दुसऱ्यांकडून शेअर मार्केटबद्दल जाणून घेणाऱ्या आजी आज स्वतः युट्युबच्या मदतीने लोकांना शेअर मार्केट समजून सांगत आहे.

भाग्यश्री फाटक युट्युबसोबत काही मासिकांमध्ये शेअर मार्केटबद्दलचे लेख लिहतात. तसेच त्यांनी लिहलेली शेअर मार्केट समजावणारी दोन पुस्तके बाजारात आलेली आहे. त्यामुळे आज त्या एक यशस्वी गुंतवणूकदार बनल्या आहे.

सुरुवातीला हे सगळं शिकताना आजींना अनेक अडचणी आल्या. त्याकाळी ऑनलाइन ट्रेडिंग नव्हती, त्यामुळे शेअर मार्केट शिकायचे असेल तर ब्रोकरकडे जावे लागायचे. तेव्हा ब्रोकरच्या ऑफीसमध्ये महिला नसायच्या. सगळे पुरुषच तिथे बसलेले असायचे.

शेअर मार्केटच्या अभ्यास करणाऱ्या आजींना तेव्हा अनेक लोक हसत देखील होते. मात्र आजींनी लोकांना दुर्लक्षित केले आणि त्या अभ्यास करत राहिल्या. पुढे जसे जसे तंत्रज्ञान बदलत गेले त्यापद्धतीने आजींनी हे तंत्रज्ञान आत्मसात केले.

सकाळी उठल्या उठल्या आजी टीव्ही लावतात. दिवसभरात मार्केटमध्ये कसे बदल होतात, याच्या आजी नीट नोंदी ठेवतात. तसेच अभ्यासाच्या जोरावर त्यांनी रोज ब्लॉग लिहण्यास सुरुवात केली होती. आता ब्लॉगसोबत त्या रोज शेअर मार्केटच्या व्हिडीओदेखील बनवतात.

आजींना शेअर मार्केटचा अभ्यास करण्यात त्यांच्या कुटुंबियांचीही खूप मदत होत असते. कोणत्या गोष्टी लोकांना शिकण्याच्या दृष्टीने, पैसे मिळवण्याच्या दृष्टीने योग्य आहे त्या गोष्टी मी युट्युबच्या व्हिडीओमध्ये सांगते, असे भाग्यश्री पाठक यांनी म्हटले आहे.

साठीच्या वयात अनेक लोक निवृत्तीचा विचार करत असतात. अशा वयात भाग्यश्री पाठक यांच्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या उत्साहाने त्यांनी युट्युबवर एक नवीन ओळख निर्माण केली आहे. भाग्यश्री पाठक यांची ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी.

Leave A Reply

Your email address will not be published.