तुम्ही भगत सिंग यांना कधी हसताना पाहिलं नसेल तर हा व्हिडीओ नक्की पहा

0

 

 

सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, आता असाच एक सोशल मीडिवर काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी, शहिद भगत सिंग यांचे हसतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊया त्यामागची गोष्ट…

आपण अनेकदा सिनेमात निर्जीव गोष्टींमध्ये जीव आलेल्याचे चमत्कार बघतो, पण हे उभ्या आयुष्यात हे शक्य नाही. पण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की कोणत्याही निर्जीव फोटोमध्ये भाव आणता येणे शक्य झाले आहे.

एआय टुलच्या माध्यमाने कोणत्याही फोटोमध्ये हालचाली निर्माण करता येऊ शकतात. ट्विटरवर हा ट्रेंड सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यातच आता भगत सिंग आणि महात्मा गांधींचे या व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Deep nostalgia हा एक एआयमधली एक डिपफेकरी आहे. याच्या साहय्याने कोणत्याही फोटोला एक व्हिडिओमध्ये कन्वर्ट करता येतो आहे. एक ऑनलाईन Genealogy कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करुन फोटोला जिफमध्ये कन्वर्ट केले जाते.

कंपनीने याच्यासाठी एक डी-आडी लायसेंस घेतले आहे. फोटोचे जिफ तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त त्या वेबसाईटवर पोट्रेट फोटो अपलोड करावा लागणार आहे. टुल फेशियल मुमेंट्सचा आणि एआयचा वापर करुन आपल्याला कोणत्याही फोटोवर फेशियल मुमेंट्स आणता येतात.

हे टुल वापरल्यानंतर अनेक लोकांना विश्वास बसत नाहीये, कारण या टूलचा वापर केल्यानंतर असे वाटते तो फोटोवरुन व्हिडिओ नाही, तर खराखुरा व्हिडिओ आहे. कारण फोटोमध्ये डोळ्यांच्या हालचाली दिसून येतात.

तुम्ही पण या वेबसाईटचा वापर करु शकतात, https://www.myheritage.com/deep-nostalgia या वेबसाईटवर तुम्ही हवा तो फोटो अपलोड करु शकतो. फक्त तुम्ही अपलोड केलेला फोटो चांगल्या क्वालिटीचा असेल तर लगेच काही सेकंदातच तुम्हाला त्या फोटोचा जिफ फाईल मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.