माणूसकीला सलाम! कोरोनाच्या संकटात भीक मागून या भिक्षूकाने दान केले ९० हजार

0

 

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. अशा संकटात एका भिक्षूकाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या भिक्षूकाला सर्वजण सलाम ठोकत आहे. हा भिक्षूकाने कोरोनाला हरवण्यासाठी जी मदत केली आहे. त्यामुळे सगळीकडेच त्याचे कौतूक केले जात आहे.

तामिळनाडूच्या मदुरै गावात राहणाऱ्या या भिक्षूकाचे नाव पुलपांडियन आहे. पुलपांडियन यांचे मूळगाव तूतीकोरीनमध्ये राहतात. गरीबीमुळे त्यांना भीक मागावी लागत आहे, पण ते जमवलेले सर्व पैसे समाजाच्या विकासासाठी दान करत असतात.

पुलपांडियन यांना राहण्यासाठी घर नाहीये, असे असतानाही ते कोरोना संकटावर मात करण्यासाठी आणि लोकांची मदत करण्यासाठी शहरांमध्ये भीक मागत आहे. त्यामुळे हा भिक्षूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

केंद्र सरकारच्या सिटिजन इंगेजमेंट प्रोग्राम माय गव्हर्नमेंट नुसार, पुलपांडियन यांनी वेगवेगळ्या शहरात जाऊन ९० हजार रुपये भीक मागून जमवले होते. त्यानंतर त्यांनी जमवलेले सर्व पैसे राज्यातील कोरोना रीलीफ फंडमध्ये जमा केले आहे.

भिक्षूक पुलपांडियनने गेल्यावर्षी मदुरै जिल्ह्याचे कलेक्टर विनय कुमार यांना १० हजार रुपये दिले होते. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठीही ते धडपड करत असतात, त्यामुळेच त्यांनी हे पैसे दान केले होते.

पुलपांडियन यांना खरा समाजसेवकची उपाधी मिळाली आहे. गरीबीत असताना भीक मागून समाजाच्या हिताचा विचार पुलपांडियन करत आहे, म्हणून विनय कुमार यांनी त्यांना सामाजिक कार्यकर्त्याची उपाधी देऊन सन्मानित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.