जाणून घ्या बच्चू दादांच्या ढाब्याबद्दल; पैसे असेल तर द्या नाही तर फुकटात जेवा

0

 

सध्या सोशल मीडियावर बाबा का ढाब्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या ढाब्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांना ग्राहक मिळत नव्हते. मात्र जेव्हा त्यांची व्हिडीओ व्हायरल झाली तेव्हा त्यांना ग्राहक मिळू लागले आणि त्यांच्याकडे पैसेदेखील येऊ लागले.

बाबाचा ढाब्याला प्रसिद्धी मिळाली पण गुजरातमध्ये ‘बच्चू दादा’ नावाचा एक ढाबा आहे. या ढाब्याला अजूनही खूप कमी लोक जाणून आहे. हा ढाबा एक वृद्ध माणूस चालवतो. या ढाब्यात तुम्ही हवे तितके खाऊ शकतात तेही पैसे न देता. विश्वास बसत नसेल पण खरं आहे. जाणून घेऊया या ढाब्याची गोष्ट…

बच्चू दादा यांचा हा ढाबा मोरबीच्या सुरज पाथ रोडवर आहे. या धाब्यावर असा बोर्ड लावला आहे की, जितके खायचे तितके खा,  जर तुमच्याकडे पैसे असेल तर द्या, नसेल तर देव तुमचे भले करो, असे त्या बोर्डवर लिहण्यात आले आहे.

गेल्या ४० वर्षांपासून हा बच्चू दादांचा ढाबा सुरू आहे. बच्चू दादा यांच्या या थाळीची किंमत तर ४० रुपये आहे पण ते ३०, २० आणि १० रुपयांना विकतात. इतकेच काय तर कोणाकडे पैसे नसेल तर  बच्चू दादा त्यांच्याकडून पैसे देखील घेत नाही.

गेल्या ४० वर्षांपासून त्यांच्या पत्नीने देखील या कामात त्यांची मदत केली होती. मात्र गेल्या वर्षी बच्चू दादा यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर बच्चू दादा एकटे पडले, मात्र त्यांनी हे काम अजून पण सोडले नाही. ते अजूनही लोकांची मदत करत आहे.

त्यांच्या या ढाब्याला अजून जास्त प्रसिद्धी मिळालेली नाही, पण त्यांचा हेतू हा पैसे मिळवणे नाही तर लोकांचे पोट भरणे आहे, असे बच्चू दादा सांगतात. मला जो पर्यंत हे करता येईल तो पर्यंत करेल, मी इथेच राहून लोकांना जेवू घालेल, असेही बच्चू दादा म्हणतात.

आजच्या महागाईच्या युगात सामान्य हॉटेलमध्ये मिळणारे जेवणही १०० रुपयांना मिळते. त्यामुळे अनेक गरीब लोकांना जेवण मिळणे कठीण होते. त्यामुळे बच्चू दादा यांनी ही सेवा सुरू केली आहे.

बच्चू दादांच्या या ढाब्यामुळे अनेक लोकांना जेवण मिळते. यात थाळीत रोटी, डाळभट, ताक, पापड, लोणचे, तीन भाज्या, असतात. एखाद्या भुकेलेल्या माणसाला हे जेवण पुरेसे आहे. रोज जवळपास १०० माणसे तरी जेवायला येतात, मात्र त्यातले १० माणसे आजोबांना जेवणाचे पैसे देत नाही.

बाबांच्या या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी अजून पर्यंत कोणत्याही भुकेलेल्या माणसाला जेवण दिल्याशिवाय परत पाठवलेले नाही. प्रत्येक माणसाने ४० रुपये जरी दिले, तरी बच्चू दादांना दिवसाला १०० रुपये मिळतात, बरेचदा तेवढेही मिळत नाही.

बच्चू दादा हे आर्थिक परिस्थितीने श्रीमंत नसले तरी ते मनाने खूप श्रीमंत आहे. हे त्यांनी दाखवून दिले आहे. बच्चू दादांची ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.