काय होता भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास; जाणून घ्या एका क्लिकवर

0

 

 

१ जानेवारी २०२१ ला भीमा-कोरेगावची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या लढाईतल्या विजयाला २०२ वर्षे पूर्ण होणार आहे, पण २०२ वर्षांपूर्वी नेमकं असे काय झाले होते. काय आहे या लढाई मागचा इतिहास? चला तर मग आज जाणून घेऊया..

१ जानेवारी १८१८ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये हे युद्ध झालं होतं. त्याकाळी पुण्यावर ब्रिटिशांची सत्ता होती. पुणे  पेशव्यांचा बालेकिल्ला असल्याने पेशव्यांना तो सोडवायचा होता.

त्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फ़ौजफाटा घेऊन पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले. पेशव्यांसोबत युद्धाची कल्पना येताच इंग्रजांनीही युद्धाची तयारी सुरू केली. इथे पेशव्यांकडे २८ हजारांचे सैन्य होते तर इंग्रजांकडे  जवळपास ८०० सैनिक होते.

इंग्रजांचे सैनिक कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली लढणार होते. पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथल्या भीमा कोरेगाव नदीच्या काळी दोन्ही सैनिकांची गाठ पडली आणि तिथेच युद्ध सुरू झाले.

इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट या सैनिकांच्या तुकडीत ५०० महार सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांना १२ तास रोखून धरले होते. इतके बलाढ्य सैनिक असून पण इंग्रजांच्या सैनिकांनी त्यांना एक इंच पण पुढे सरकू नाही दिले.

तेव्हा इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याचे पेशव्यांना कळाले. त्यामुळे पेशवांनी लगेच या युद्धातून काढता पाय घेतला आणि त्यामुळे इंग्रजांचा विजय झाला.

पेशव्यांच्या आणि इंग्रजांमध्ये झालेल्या या लढाईत पेशव्यांचे ६०० तर इंग्रजांचे २७५ सौनिक मृत्युमुखी पडले होते. या लढाईत महार सैनिकांनी आपले शौर्य दाखवून विजय मिळवला होता. त्या विजयाचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी भीमा-कोरेगाव इथे विजय स्तंभ उभारला होता आणि त्यावर मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची नावे कोरण्यात आली.

पेशव्यांच्या राजवटीत दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जायची. त्यावेळी दलितांचे मूलभूत अधिकार पण नाकारले जायचे. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच महार सैनिकांनी प्राणाची बाजी लावत पेशव्यांवर विजय मिळवून दिला होता.

१ जानेवारीला १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विजय स्तंभला भेट दिली होती, तसेच तिथे आदरांजली वाहिली होती. त्यामुळे दरवर्षी १ जानेवारीला तिथे येण्याची प्रथा पडली.

Leave A Reply

Your email address will not be published.