करोडपती सलूनवाला, ज्याच्याकडे आहेत रॉल्स रॉयस ऑडीसारख्या २५६ महागड्या गाड्या

0

 

 

जर तुम्हाला कोणी म्हटले की देशातला एक सलूनवाला करोडपती आहे, तर तुमचा नक्कीच या बोलण्यावर विश्वास नाही बसणार. पण तुम्हाला माहितीये का भारतात एक सलूनवाला असा आहे, ज्याच्याकडे २५६ पेक्षा जास्त कार आहेत, त्यामध्ये रोल्स रॉयस मर्सिडिज बेन्ज अशाही गाड्या आहेत.

बंगळूरु शहरात राहणाऱ्या या सलूनवाल्याचे नाव रमेश बाबू असे आहे. रमेश यांना सोडून बंगळूरु शहरात काही मोजकेच लोक आहेत, ज्यांच्याकडे रोल्स रॉयस आहे. आजची ते जरी करोडपती असले तरी ते सुरुवातीला एका सामान्य कुटुंबातलेच होते. पण त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीच्या जीवावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

रमेश बाबू बंगळूरूच्या अनंतपुर शहरात राहतात. रमेश ७ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या आईने दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवण्याचे काम केले. त्यावरच रमेश यांचे घर चालायचे.

रमेश यांच्या काकांनी रमेशच्या वडिलांची दुकान भाड्याने घेतली होती, पण ते फक्त पाच रुपये भाडे द्यायचे. त्यामुळे त्यांचे घर चालवणे खुप कठिण होते. रमेश मिळून ते तीन भाऊ-बहिण होते, घरची परिस्थिती नसल्याने त्यांनी दिवसातून एकवेळचेच जेवण करण्यास सुरुवात केली.

रमेशला आपल्या परिस्थितीची जाणीव होती, त्यामुळे त्यांनी लहानपणीच काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी दुध विकले, पेपर वाटले. शाळेतले शिक्षण सुरु होते पण त्यांना ते पुर्ण करण्यात अडचण येत होती. रमेश यांचे दहावीचे शिक्षण झाले पण बारावीमध्ये रमेश नापास झाले.

१२ वीमध्ये नापास झाल्यानंतर त्यांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्युटमधून इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा केला. १९८९ मध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या दुकानाला सुरुवात केली. त्यांनी दुकान मॉडर्न केली, त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधरत होती.

त्यांनी कर्ज काढून एक मारुती सुझूकी ओमनी घेतली, पण त्यांना चालवता येत नसल्याने ती घरीच ठेवलेली होती, तसेच त्याचे हफ्ते भरणे कठिण चालेले होते. तेव्हा त्यांनी ती ओमनी भाड्याने दिली. २००४ मध्ये त्यांनी रमेश टूर अँड ट्रव्हलची सुरुवात केली.

आज त्यांच्याकडे २५६ गाड्या आहेत आणि ६० पेक्षा जास्त ड्रायव्हर आहेत. रमेश यांच्याकडे आज ९ मर्सिडिज, ६ बीएमडब्ल्यु, ३ ऑडी, एक जॅग्वार अशा महागड्या गाड्या आहेत. यासर्व गाड्या त्या भाड्याने देतात. तसेच त्यांची रोल्स रॉयस भाड्याने देऊन एका दिवसाचे ५० हजार रुपये ते घेतात. विशेष म्हणजे सलमान खान शाहरुख खान सारखे सेलिब्रिटीही त्यांचे क्लाईंट आहे.
आज रमेश बाबू हे करोडपती असले तरी त्यांनी आपला सलूनचा व्यवसाय नाही सोडला, ते अजून सुद्धा सलून इनर स्पेस चालवतात. जिथे ते रोज दिवसातले दोन तास ग्राहकांच्या केसांची कटींग करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.