लाल दिव्याची गाडी तर हाय पण स्वत:च्या हक्काचं घर नाय, बच्च कडूंबद्दलच्या या गोष्टी माहितीये का?

0

 

 

असे म्हणतात एकदा माणूस राजकारणात गेला की त्याच्या सात पिढ्या बसून खातात. ते घर, बंगले गाड्या सर्व काही मिळवतात. पण काही नेते हे फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेसाठी राजकारणात येत असतात, त्यातलेच एक नेते म्हणजे बच्चू कडू.

अपना भिडू बच्चू कडू अशी बच्चू कडूंची ओळख. दिवस असो वा रात्र कधीही मदतीला बोलवा लोकांच्या सेवेसाठी बच्चू कडू हजर राहतात. अंध अपंग, गोरगरीब प्रत्येकांच्याच मदतीला बच्चू कडू धावून येत असतात. आज आपण त्यांच्याच बद्दलच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

बच्चू कडू हे आतापर्यंत तीन वेळा आमदार झाले आहेत पण आजही त्यांच्याकडे स्वत:च्या हक्काचे घर नाहीये. त्यांच्याकडे लाल दिव्याची गाडी असली तरी ते आजही भाड्याच्या घरात राहतात. त्यांचे शिक्षण बी.कॉम झाले आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे, तसेच त्यांना एक मुलगा आहे. बच्चू कडू यांचा आजही मुख्य व्यवसाय शेती आहे.

बच्चू कडू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालूक्यातील बेलोरा गावात झाला होता. बच्चू कडू यांचे खरे नाव ओमप्रकाश बाबूराव कडू असे आहे.

बच्चू कडू यांना लहानपणापासूनच समाजकार्यात खुप रस होता. फक्त त्यामुळे आठवीत शिकत असताना त्यांनी तमाशा बंदीसाठी आंदोलन केले होते. तरुणांचे आयुष्य उद्धवस्त होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले होते.

बच्चू कडू यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा खुप प्रभाव होता, त्यामुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पुढे त्यांना शिवसेनेकडून चांदूरबाजार समितीचे सभापती करण्यात आले. सभापती असताना त्यांनी लोकांसाठी खुप कामे केली, त्यावेळी त्यांनी शौचालय घोटाळा सुद्धा उघडकीस केला होता.

बच्चू कडू यांना अपंगांना सायकल वाटप करायची होती, पण निधी न मिळाल्यामुळे शिवसेना नेत्यांशी त्यांचा वाद झाला आणि त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली. १९९९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून पहिली विधानसभेची निवडणूक लढवली पण त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

२००४ साली त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. ते आतापर्यंत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे, पण आजही ते भाड्याच्या घरात राहतात. आमदार असूनही आमदाराच्या पगारवाढीला विरोध करणारे बच्चू कडू एकमेव नेते आहे.

बच्चू कडू यांनी महात्मा गांधींच्या जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर लग्न केले होते. तसेच लग्नात खर्च करण्यापेक्षा त्यांनी अपंगाना सायकली वाटल्या होत्या. त्यांनी लग्न खर्चाच्या बचतीतून २५० अपंगांना तीनचाकी सायकल वाटल्या होत्या. तसेच कृत्रिम अवयवांचे वाटप केले होते.

बच्चू कडू यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्तवेळा रक्तदान केले आहे. एकदा तर मित्राला रक्त द्यायचे होते, तेव्हा वजन कमी पडले तेव्हा त्यांनी खिशात दगड ठेवून रक्तदान केले होते. त्यांनी १००० रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते, तेव्हा लोकांनी केलेल्या रक्तदानातून त्यांनी १५००० बाटल्या रक्त वेगवेगळ्या रुग्णालयांना पाठवले होते.

बच्चू कडू यांनी १५०० हृदय रुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या आहे. त्यांनी २००० लोकांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी मदत केली होती. तसेच आतापर्यंत त्यांनी १८ लाख लोकांना मोफत रुग्णसेवा दिली आहे.

बच्चू कडू यांनी अनेक आंदोलने केली आहे, विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी ती आंदोलने निर्णय लागेपर्यंत सुरुच ठेवलेली आहे. शासकीय अधिकारी काम करत नसल्याने त्यांनी ऑफिसमध्ये साप सोडून आणि सुतळी बॉम्ब सोडून आंदोलन केले होते.

तसेच बच्चू कडू अपंग लोकांसाठी २५ हजार लोकांचा मोर्चा दिल्लीला घेऊन गेले होते. त्यावेळी केंद्राने एका दिवसात ११ निर्णय घेतले होते. अशाप्रकारे ते लोकांच्या मदतीला नेहमीच धावून आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.