..अन् रमाबाईंनी ठरवले भीमरावांना इतके सुशिक्षित बनवायचे की देशात शिक्षणाची मशाल पेटली पाहिजे

0

भारतीय राज्यघटनेचे निर्माता आणि भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आव्हानांचा सामना केला. पण ते कधीही थांबले नाहीत. त्यांच्या प्रवासात बर्‍याच लोकांनी त्यांचे समर्थन केले. एकदा त्यांच्या शाळेतील एका शिक्षकांनी आंबेडकरांमधील धमक ओळखली आणि त्यांना वेगळे नावही पाडले.

त्यानंतर शाहूमहाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. या सर्व लोकांमध्ये आणखी एक नाव आहे ज्यांच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची यशोगाथा अपुर्ण आहे ते नाव म्हणजे रमाबाई आंबेडकर. रमाबाई भीमराव आंबेडकर म्हणजे बाबा साहेबांच्या पत्नी होत्या.

आजही लोक त्यांना ‘मातोश्री’ रमाबाई या नावाने ओळखतात. ७ फेब्रुवारी १८९८ रोजी जन्मलेल्या रमाबाई यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांचे आईवडील बालपणातच मरण पावले. अशा परिस्थितीत त्यांच्या मामाने त्यांना आणि त्यांच्या बहिणींनी सांभाळले.

१९०६ मध्ये वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचे लग्न १४ वर्षांच्या बाबासाहेब आंबेडकरांसोबत बॉम्बे (आताचे मुंबई) च्या भायखळा मार्केटमध्ये झाले. भीमराव रमाबाईंना प्रेमाने ‘रामू’ म्हणायचे आणि रमाबाई त्यांना ‘साहेब’ म्हणायच्या. लग्नानंतर लगेचच रमाला समजले की मागासवर्गीयांची उन्नती ही बाबासाहेबांच्या जीवनाचे लक्ष्य आहे.

हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते स्वत: इतके सुशिक्षित झाले पाहिजेत की संपूर्ण देशात शिक्षणाची मशाल पेटविली जाऊ शकते. बाबासाहेबांच्या या संघर्षात रमाबाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे समर्थन केले. बाबासाहेबांनीही त्यांच्या जीवनात रमाबाईंचे योगदान महत्त्वपूर्ण मानले आहे.

‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तक रमाबाईंना समर्पित करताना त्यांनी लिहिले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भीमराव ते डॉ. आंबेडकर बनवण्याचे श्रेय हे रमाबाईंना जाते. रमाबाईंनी प्रत्येक परिस्थितीत बाबासाहेबांचे समर्थन केले. बाबासाहेब वर्षानुवर्षे शिक्षणासाठी बाहेर राहिले आणि यावेळी रमाबाईंनी लोकांचे बोलणे एकले आणि पुर्ण घर सांभाळले.

कधीकधी त्या घरोघरी जाऊन शेणाच्या गौऱ्या विकायच्या तर कधी त्या दुसऱ्यांच्या घरात धुणेभांडे करण्यासाठी जात असत. त्यांनी बाहेर काम करून पैसै कमावले आणि तेच पैसै बाबासाहेबांना देऊन त्यांच्या शिक्षणात मदत केली. त्यांच्या आणि बाबासाहेबांच्या जीवनाच्या संघर्षात पाच मुलांपैकी फक्त एकच मुलगा जगला.

त्याचे नाव यशवंत होते. पण तरीही रमाबाईं खचल्या नाहीत, उलट त्यांनी स्वत: बाबासाहेबांचे मनोबल वाढवले. बाबासाहेबांना आणि या देशातील लोकांना रमाबाईंचे समर्पण लक्षात घेता अनेक लेखकांनी त्यांना ‘त्यागवंती रमाई’ हे नाव दिले. आज बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच त्यांच्या जीवनावरही नाटकं, चित्रपट बनवले गेले आहेत.

देशातील अनेक संस्थांची नावेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्यावर रमाई, त्यागवंती रमामाऊली आणि प्रिय रामू अशी अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. २९ वर्षे बाबासाहेबांची साथ दिल्यानंतर रमाबाई यांचे दीर्घ आजारामुळे २७ मे १९३५ रोजी निधन झाले. असे म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो आणि ‘मातोश्री’ रमाबाईंनी ही म्हण खरी करून दाखवली.

Leave A Reply

Your email address will not be published.