नंदुरबारच्या पठ्ठ्याने मिरचीची लागवड करून पाच महिन्यात कमावले १२ लाख रुपये

0

 

भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे इथे शेतीमध्ये लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्या प्रयोगातुन शेतीकरी लाखो रुपये कमवतात.

आज आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहे, ज्याने मिरचीची करून पाच महिन्यात तब्बल १२ लाख रुपये कमावले आहे. या शेतकऱ्याचे नाव अविनाश पाटील असे आहे.

अविनाश पाटील हा नंदुरबार जिल्ह्याच्या ब्राम्हणपुरी गावात  असलेली वडिलोपार्जित शेती सांभाळत आहे. त्याने शेतीला आधुनिकतेची जोड देत मिरचीची शेती केली आहे.

अविनाशने योग्य नियोजन करून सहा एकर क्षेत्रात मिरचीची लागवड करून पाचशे क्विंटल मिरचीचे उपन्न घेतले आहे, तसेच पुढे मार्चपर्यंत आणखी पाच क्विंटल मिरचीचे उपन्न घेण्याची अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.

अविनाश एक उच्च तरुण आहे. तो आधी गुजरातमधील सुरत येथे कोटक महिंद्रामध्ये कामाला होता. पण कंपनीत मन लागत नसल्याने त्यामुळे त्याने ती नोकरी सोडली आणि शेती करण्याचा निर्णय होता.

अविनाशच्या गावात पारंपारिक पद्धतीने केळी आणि पपईचे उत्पादन घेतले जाते. आपण काहीतरी वेगळा प्रयोग करून बघितला पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने मिरचीही लागवड केली.

त्याने ५०० क्विंटल मिरचीचे उत्पन्न घेतले आहे. त्याने सहा एकराच्या मिरचीच्या लागवडीसाठी ४.५० लाख रुपये खर्च एल असून या मिरचीच्या विक्रीतून त्याला १२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच संपूर्ण मिरचीची विक्री झाल्यानंतर एकूण खर्च जाऊन २० लाखांचा नफा होईल, असे अविनाशने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.