नाद खुळा! ऊसाची शेती करता करता सुचली भन्नाट आयडिया, आता कमवतोय लाखो रुपये

0

 

देशभरात लॉकडाऊन लागल्याने अनेक लोकांचे रोजगार गेले, त्यामुळे लोक आपल्या गावी परतून स्वता:चा व्यवसाय सुरु करताना दिसून आले आहे. आजची गोष्टही अशीच काहीशी आहे.

पठाणकोटच्या गोसाईंपुरमध्ये राहणारे सरदार अवतार सिंग परदेशातील नोकरी सोडून गावी गुळ बनवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याच्या गुळाला देशातच नाही तर परदेशातही मागणी आहे. ते या व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहे.

गेल्या ८ वर्षांपासून अवतार सिंग मलेशियात नोकरी करायचे, पण आता ते ऊसाची शेती करत आहे. बाहेर देशात नोकरी करत असताना त्यांचे तिथे मन लागत नव्हते. त्यामुळे ते गावी परतले.

गावी परतल्यानंतर त्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शेती सुरु केली. त्यांनी ऊसाची शेती करण्यास सुरुवात केली होती, तिथुनच त्यांना गुळ बनवण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी गुळ बनवण्याचा व्यवसाय सुरु केला.

आज त्यांचा गुळ पुर्ण पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर त्यांचा गुळ विदेशातही प्रसिद्ध आहे. पठाणकोटची जमीन ऊसाची शेती करण्यासाठी उपयुक्त आहे. अवतार सिंग त्यातुन रोज दीड क्विंटल गुळ तयार करतात. सीजनमध्ये त्यांची ४ लाख रुपयांची कमाई झाली होती.

अवतार सिंग यांनी गुळ बनवणयाची खास ट्रेनिंग घेतली आहे. कृषी विभागाने आयोजित केलेल् कार्यक्रमात त्यांनी हि ट्रेनिंग घेतली होती. त्यांनी गुळ बनवण्यात एक देशी जुगाड पण केला होता.

ऊसाचा रस गरम केल्यानंतर गुळ लवकर थंड होत नव्हता, त्यासाठी त्यांनी एक जुगाड शोधला होता. त्यांनी संगमरवरी चार बनवून त्यामध्ये गुळ टाकण्यास सुरुवात केली, त्यामुळे गुळ लवकर थंड होऊ लागला. जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, आणि इंग्लंड, यांसारख्या देशातून अवतार सिंग यांच्या गुळाला मागणी येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.