दोन मुलांना गमावले, मुंबईच्या देशराज यांनी २४ वर्षे रिक्षात राहून सांभाळले कुटुंब

0

 

सोशल मीडियामुळे अनेक लोकांचे एका रात्रीत आयुष्य बदलले आहे. आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सागणार आहोत ती अशाच एका आजोबांची आहे, ज्यांनी आपल्या नातीला स्वता:चे सुरक्षित घर मिळावे यासाठी तब्बल ३५ वर्षे रिक्षात राहिले. पण त्यांचा संघर्षाचा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांना घर बांधण्यासाठी तब्बल २४ लाखांची मदत मिळाली आहे.

मुंबईत राहणाऱ्या या आजोबांचे नाव देशराज ज्योत सिंग असे आहे. ते मुंबईत रिक्षा चालवतात. हे आजोबा ७ वर्षांचे आहे. गेल्या २४ वर्षांपासून ते रिक्षामध्ये राहत होते, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांना आता २४ लाखांची मदत मिळाली आहे.

इतक्या वर्षांपासून ते रिक्षामध्ये राहूनच ते आपल्या कुटुंबाची पुर्ण जबाबदारी सांभाळत आहे. त्यांना तीन मुले होती, ज्यात एकाचा मृत्यु झाला आहे, तर एका मुलाने आत्महत्या केली. त्यानंतर हे आजोबाच त्यांच्या कुटुंबाला सांभाळत आहे.

देशराज गेल्या २४ वर्षांपासून रिक्षामध्येच राहत होते. तिथेच जेवायचे, तिथेच झोपायचे. तसेच रिक्षा चालवून ते कुटुंबाला पैसे देतात, ज्यामुळे त्यांच्या नातवांच्या शिक्षणाचा खर्च निघेल.

रिक्षा चालवून त्यांची इतकी कमाई होऊन जाते की ते स्वता:चा खर्च काढून आपल्या कुटुंबालाही पैसे पाठवता येईल. पण बऱ्याचवेळा त्यांना जेवण करता येईल इतके पैसेही मिळत नाही.

जेव्हा त्यांच्या मुलांचा मृत्यु झाला, तेव्हा तर त्यांना रडता सुद्धा आले नाही कारण कुटुंबाची पुर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. गेल्या २४ वर्षांपासून ते रिक्षातच राहत होते. त्यांना आपल्या नातवांसाठी एक पक्के घर बांधायचे होते, त्यासाठी त्यांचा हा संघर्ष सुरु होता.

अशात त्यांच्या संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, त्यामुळे अनेक लोकांकडून या आजोबांना मदत मिळाली आहे. त्यांना २० लाख रुपयांची गरज होती, असे असताना त्यांना लोकांकडून २४ लाखांची मदत झाली आहे, त्यामुळे आता लवकरच त्यांचा हा संघर्ष संपणार असून त्यांनी २४ वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.