एकेकाळी रिक्षा चालवणारा हा माणूस बनला करोडपती; कसा ते वाचा

0

माणसाच्या आयुष्यात त्याला कधी न कधी संकटांचा सामना करावाच लागतो. जर तो संघर्ष करत राहिला तर त्याला एक दिवस नक्की आपले ध्येय गाठता येते, आजची गोष्ट अशा माणसाची आहे ज्याने एकेकाळी रिक्षा चालवली होती पण आज तो कोट्यवधी रुपये कमवतोय.

हरिकिशन पिप्पल असे या माणसाचे नाव आहे. हरिकिशन यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील बूट बनवण्याचा व्यवसाय करत होते. त्यामुळे सर्व कुटुंबच त्या व्यवसायावर अवलंबून होते.

सर्व काही ठीक असताना हरिकिशन यांचे वडिल आजारी पडले. त्यामुळे त्यांना कुठलेच काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे हरिकिशन १० वीत असताना पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच काम करण्यास सुरुवात केली.

हरिकिशन घरच्यांना न सांगता दररोज संध्याकाळी तोंडाला कपडाबांधून सायकल रिक्षा चालवायला जायचे. तसेच हरिकिशन यांनी आग्र्याच्या जैनसन पिस्टनमध्ये मजुरीचे काम पण केले.

शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांना काम करणे भाग होते, त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना आग्राच्या विमानतळावर चादरी धुण्याचे काम मिळाले. त्यासाठी त्यांना महिन्याला ६० रुपये मिळायचे.

पुढे त्यांचे लग्न झाले. तेव्हा हरिकिशन यांच्या पत्नीने त्यांना पुन्हा आपल्या बुटांचा व्यवसाय सुरू करण्यास सांगितला. १९७५ मध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून १५ हजार रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

त्यांनी आपले स्वतःचे घर कारखाना म्हणून उभे केले आणि स्वतः कुटुंबासोबत भाड्याच्या घरात राहायला गेले. व्यवसाय सुरू केल्यानंतर ग्राहक मिळायला त्यांना अडचणी आल्या पण त्यांनी आपली मेहनत कायम ठेवली, अशात त्यांना एका कंपनीकडून १० हजार बूट बनवण्याची ऑर्डर मिळाली. त्यांनी सरकारी कंपनीचे हे ऑर्डर वेळेत पूर्ण केले.

अशात त्यांनी आपले नाव मार्केटमध्ये बनवून टाकले होते. तेव्हा त्यांनी हेरीक्सन नावाने कंपनी उभी केली. त्यांच्या बुटांची किंमत जरी जास्त असली तरी त्यांच्या बुटांची क्वालिटी चांगली असल्याने त्यांना ग्राहक मिळत होते.

पुढे त्यांनी प्रसिद्ध कंपनी बाटासोबत पण काम केले. त्यांच्या बुटांची मागणी बाहेर देशात पण होऊ लागली पण आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय बदलावांमुळे त्यांना व्यवसायात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे हरिकिशन यांनी अग्रवाल नावाने रेस्टॉरंट पण खोलले. तसेच मॅरेज हॉलदेखील त्यांनी बनवले.

पुढे दोन डॉक्टर त्यांच्याकडे आले आणि मॅरेज हॉल हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्याचा विचार मांडला. तेव्हा त्यांनी हे हॉस्पिटल बनवण्यास होकार दिला. त्यासाठी हरिकिशन यांनी ४ ते ५ कोटींचे कर्ज बँकेकडून घेतले. पण हॉस्पिटलबद्दल हरिकिशन यांना जास्त माहिती नसल्याने त्यांना खूप नुकसान होत होते.

तेव्हा हरिकिशन यांना असे कळले की डॉक्टर यांना धोका देत होते. त्यामुळे हरिकिशन यांनी ते हॉस्पिटल स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला. या हॉस्पिटलला सुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली. आज त्यांचा हा व्यवसाय त्यांचे मुलं सांभाळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.