लाखो तरूणांची धडकन असणाऱ्या ऑडीचे संस्थापक ऑगस्ट हॉर्च एकेकाळी लोहार काम करायचे

0

लाखो तरूणांची धडकन, तरूणांमध्ये ज्या कारची प्रचंड क्रेज आहे ती म्हणजे ऑडी. ऑडीचे संस्थापक ऑगस्ट हॉर्च होेते. आज आपण ऑगस्ट यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत.

जर्मन बिग थ्री लक्झरी ऑटो मेकर्स’मध्ये तिसरी कार म्हणजे ऑडी! परंतु यामागे एक संघर्ष कथा आहे. ऑडीचे मालक ऑगस्ट हॉर्च हे आधी लोहारकाम करायचे. म्हणजेच कोट्याधीश लोकांची ओळख असणाऱ्या ऑडीचे मालक/ संस्थापक एक लोहारकामगार होते. नंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन जहाज बनवणाऱ्या कंपनीत ते कामाला लागले. स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा म्हणुन १९०१ मध्ये स्वतःची हॉर्च ऑटोमोबाईल कंपनी सुरू केली.

१९०९ मध्ये हॉर्च यांना हॉर्च कारच्या कंपनीच्या संचालक मंडळावर हटविण्यात आले. पण त्याला शांत बसणे आवडत नव्हते. म्हणुन याचा १९०९मध्ये त्यांनी एक नवीन कंपनी स्थापन केली, ज्याला त्यांनी हॉर्क ऑटोमोबाईल असे नाव ठेवले जी पुढे जाऊन ऑडी झाली. ऑटोमोटिव्ह एक्सपर्ट म्हणुन जर्मनीत त्यांना ओळखलं जाऊ लागलं.

कंपनीचे नाव संस्थापकांच्या आडनावावरून ठेवण्यात आले आहे. जर्मन भाषेत ‘हॉर्श’ म्हणजे ऐकणे; जेव्हा लॅटिन भाषेत याचे भाषांतर करण्यात आले तेव्हा ‘ऑडी’ असे नाव ठेवण्यात आले.

तंत्रज्ञान, उत्तम डिझाईन, स्टायलिश लूक नजर खिळवून ठेवतो. त्यामुळे ऑडी सर्वांची आवडती बनली. ऑडी सर्वात यशस्वी जर्मन उत्पादकांपैकी एक होती. ज्याचे मुख्यालय इंगोल्स्टॅडट येथे आहे. पण ऑडी १९६४ पासून फॉक्सवॅगन ग्रुपचा भाग आहे.

हॉर्च यांचा जन्म रेनिश प्रशिया, विनिनजेन येथे झाला. त्याचा सुरुवातीचा व्यवसाय लोहार म्हणून होते, आणि त्यानंतर त्यांचे शिक्षण होचस्चुले मिट्टवीडा (मिटवेडा टेक्निकल कॉलेज) येथे झाले. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी जहाजबांधणीचे काम केले. असा संघर्षमय प्रवास करत त्यांना अनेक अडचणी आल्या. पण न डगमगता त्यांनी कष्ट केले.

जर्मन ब्रँडवरील रिंग म्हणजे ऑटो युनियन ऑटोमोबाईल गटाच्या चार ब्रॅण्ड्स आहेत, ज्याला आज आपण ऑडी म्हणून ओळखतो. हे ब्रांड ऑडी, डीकेडब्ल्यू, वांडरर आणि हॉर्च होते. आणि आता असे दिसते आहे की ऑडीने एकेकाळी प्रसिद्ध होर्च ब्रँडचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नावाने त्यांनी खास मर्डीज-मेबॅक एस-क्लास गाड्यांचे प्रतिस्पर्धी होईल अशा खास ऑडी ए ८ मॉडेल्सचे प्रकाशन केले.

‘आय बिल्ट कार’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या वाचनातून अनेक जर्मन कार उद्योजक तयार झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पण तरीही ते आजही जर्मन कार उद्योजकाचे प्रेरणास्थान आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.