मोदी सरकारच्या ‘या’ भन्नाट योजनेमुळे हा तरुण झाला मालामाल, महिन्याला कमवतोय लाखो रुपये

0

 

सध्या तरुण पिढी नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला करण्याला प्राधान्य देत आहे. आजच्या पिढीने व्यवसाय करावा यासाठी सरकारदेखील वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतात. त्यामुळे अनेकदा लोक या योजनांचा फायदा घेऊन स्वता:चा व्यवसाय सुरु करतात आणि चांगली कमाई करताना दिसत आहे.

आता केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजना स्टार्टअप इंडियाचा अनेक जण लाभ घेताना दिसून येत आहे. त्यातलेच एक तरुण म्हणजे आसिफ चव्हाण. आसिफ हा एक इंजिनियर असून मोदी सरकारच्या या योजनेचा त्याला चांगलाच फायदा झाला असून त्याने स्वता:चा व्यवसाय सुरु केला आणि आता तो या व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहे.

आसिफने जिल्हा उद्योग केंद्रातून माहिती मिळवून वेबसाईटवर डबल विंडो कुलर बनवण्याचा प्रोजेक्ट अपलोड केला. त्यानंतर त्याला बँक ऑफ बडोदाकडून २५ लाख रुपयांचे कर्ज मिळाले यातून त्याने स्वता:चा व्यवसाय सुरु केला आहे.

या स्टार्टअपमधून त्याच्या पहिल्याच वर्षाची उलाढाल २५ लाख रुपये इतकी झाली आहे. त्याने हा व्यवसाय सुरु करुन २० लोकांना रोजगारही दिला आहे.

आसिफ मेरठच्या नूरनगरमध्ये राहतो. त्याने बीटेकसोबतच एमटेकचे शिक्षणही घेतले आहे. त्याने २०१९ मध्ये हा डबल विंडो कुलरचा प्रोजेक्ट तयार केला होता. त्यानंतर त्याने भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया वेबसाईटवर हा प्रोजेक्ट अपलोड केला होता.

आता त्याने आपल्या सात नवीन प्रोजेक्टसाठी पेटंट केले, असून त्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. स्टार्टअप इंडिया योजना स्टार्टअप सुरु करणाऱ्यासांठी खुप फायद्याची आहे, असे आसिफने म्हटले आहे.

जर कोणाकडे व्यवसाय करण्याची चांगली कल्पना असेल, तर या योजनेचा लाभ घेऊन तो आपला व्यवसाय चांगला वाढवू शकतो, असेही त्याने म्हटले आहे. तसेच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही व्यक्त केले आहे.

या योजने अंतर्गत स्टार्टअप सुरु करणाऱ्याला १० लाखांपासून १ कोटींपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली व्यवसायाचा प्रोजेक्ट वेबसाईटवर अपलोड करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला परवानगी मिळते. पुढे तुम्हाला पेटंट मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसायासाठी कर्ज मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.