माणुसकीला सलाम! शेतात राबून त्यासोबत चालवते ढाबा अन् गरजूंना रोज देते मोफत जेवण

0

 

अनेक लोक समाजाला देणं म्हणून लोकांना मदत करत असतात. काही लोक आपल्या कामातुन मिळालेल्या कमाईतून काही भाग गरजूंची मदत म्हणून देताना आपण पाहिले असेल. पण आजची हि गोष्ट यापेक्षा थोडी वेगळी आहे.

गरीब लोकांना चांगले जेवण मिळावे, यासाठी एक महिला रोज सकाळी सहा वाजता उठून शेतातले काम करुन ढाबा चालवत आहे. तेरा एकर शेतीचे नियोजन केल्यानंतर पुर्णवेळ ढाब्याची जबाबदारी सांभाळून गरजू लोकांना हि महिला मोफत जेवण देत आहे.

चंद्रपुर जिल्ह्यातील धानापुरात राहणाऱ्या या महिलेचे नाव अरुणा साळवे असे आहे. अरुणा या एक महिला शेतकरी आहे. त्यांचे पती दिलीप साळवे यांची अहेरी-चंद्रपुरच्या मुख्य महामार्गावर १३ एकर जमीन आहे. त्यांची शेती रस्त्याजवळ असल्याने त्यांना रोज शेकडो भुकेलेली माणसे दिसायची.

त्यामुळे त्यांनी तिथेच एका ढाब्याला सुरुवात केली. पण काही कारणांमुळे ढाब्याची आणि शेतीची जबाबदारी त्यांच्यावर आली. तेरा एकरच्या शेतात त्या कापूस, सोयाबीन, गहु, कांदे मिरची अशा वेगवेगळ्या पिकांचे त्या उत्पादन घेत आहे.

त्यांना दोन मुली असून त्यांच्या शाळेची तयारी करुन दिल्यानंतर त्या ढाब्याचे नियोजन करातात. त्यात ढाब्यामध्ये स्वयंपाक बनवण्यापासून बाकीचे सर्वच नियोजन त्या करतात.

ढाबा रस्त्यालगत असल्याने रोज अनेक लोक त्यांच्या ढाब्यात येत असतात. ढाब्यात आलेल्या अनेक गरजू आणि गरिब लोकांना ढाब्यातुन रोज मोफत जेवण दिले जाते.

दिवसातुन अनेक लोकांना मोफत जेवण दिले जाते. आम्ही त्यात कधीच पैशाचा हिशोब करत नाही. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही हे काम करत आहे, असे अरुणा साळवे यांनी म्हटले. अरुणा यांची गरीब लोकांना जेवण देण्याची हि धडपड अनेक लोकांसाठी प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.