वाचा, महिन्याला १० हजार रुपये कमवणारा हा तरुण, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कसा कमतोय ८० हजार

0

 

 

कोरोनाच्या संकटात लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, त्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशात काही लोकांनी संकटामध्येही संधी शोधून व्यवसाय सुरु केला आहे आणि आता त्यातून ते चांगलीच कमाई करत आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाबद्दल सांगणार आहोत, जो लॉकडाऊनच्या आधी फक्त १० हजार रुपये कमवायचा पण आता तोच माणूस लॉकडाऊननंतर महिन्याला ८० हजार रुपये कमवत आहे.

या माणसाचे नाव महेश कापसे आहे. महेश एक चित्रकार आहे. महेश सुरुवातीला चित्रकलेचे शिक्षक म्हणून कार्यरत होते, पण लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळाने त्यांना एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे.

लॉकडाऊन काळात त्यांनी आपण काढलेले काही चित्रे सोशल मीडियावर टाकली, ती चित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यांच्या चित्रांनी सिनेमातील कलाकारांनाही भुरळ घातली आहे. बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखनेही त्याचे कौतूक केले आहे.

महेश मूळचे बुलढाण्यातले आहे. पण ते औरंगाबादच्या एका शाळेत चित्रकलेचे शिक्षक म्हणून नोकरी कर होते. पण लॉकडाऊन लागल्यामुळे त्यांची शाळेची नोकरी गेली. त्यामुळे ते पुन्हा आपल्या गावी परतले. त्यांनी चित्र काढून ती सोशल मीडियावर टाकण्यास सुरुवात केली.

त्यांनी टिकटॉकवर व्हिडीओ बनवले, त्यामुळे काही दिवसांतच ते सोशल मीडियावर चांगलेच फेमस झाले. त्यामुळे त्यांना दिवसाला २ ते ३ ऑर्डर मिळतात म्हणजेच महिन्याभरात जवळपास त्यांना ४० पेंटींग्सच्या ऑर्डर मिळतात.

महेश प्रत्येक पेंटींगचे दोन हजार रुपये घेतात अशाप्रकारे महिन्याभरात त्यांची तब्बल ८० हजार रुपये कमाई होते. विशेष म्हणजे त्यांना चित्र काढण्यासाठी फक्त १० मिनिटे लागतात. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या काही पेंटींग्स इतक्या व्हयरल झाल्या होत्या की अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या कलेचे चाहते बनले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.