वाढदिवस स्पेशल: अनुपम यांना सेटवरच आला होता पॅरेलिसिसचा अटॅक, पण तरीही त्यांनी..

0

आज ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १९५५ साली एका कश्मिरी पंडित कुटुंबात झाला होता. शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनेता बनण्याचे ठरवले आणि आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी ते मुंबईत आले.

एक काळ असा होता की त्यांनी फुटपाथवर आणि रेल्वे स्टेशनवर दिवस काढले होते. पण त्यांनी हार मानली नाही. आपल्या धडाकेबाज अभिनयाने त्यांनी अनेकांना भुरळ पाडली. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये ५०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे.

पण तुम्हाला माहित आहे का? हम आपके है कौन च्या चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान अनुपम यांना खुप त्रास झाला होता. त्यांना या चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान चेहऱ्याच्या उजव्या भागाला लकवा मारला होता.

या चित्रपटात त्यांनी पित्याची भुमिका साकारली होती. त्यांना फेशिअल पॅरालिसीसचा अटॅक आला होता. आधी त्यांना वाटले की थकवा आल्यामुळे असा त्रास होत असावा असे त्यांना वाटले होते. पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या तोंडातून आपोआप पाणी बाहेर पडताना त्यांना दिसले.

ते त्यावेळी ब्रश करत होते. त्यांना जाणवले की त्यांचा चेहरा वाकडा होत आहे. यानंतर अनुपम यांनी लगेत डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना २ महिने काम बंद करण्याचा सल्ला दिला होता.

मात्र ते डॉक्टरांकडून थेट हम आपके है कौनच्या सेटवरती पोहोचले. त्यांचा वाकडा झालेला चेहरा पाहून कोणालाच काही कळत नव्हते. सलमान खान आणि माधुरीला वाटले अनुपम खेर मस्करी करत आहेत.

मात्र तेव्हा ज्यांनी सत्य सांगितले सगळ्यांना धक्काच बसला होता. अशा परिस्थितीत त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला. चेहरा वाकडा असताना त्यांनी शुटिंग पुर्ण केले. त्यामुळे या सिनेमामध्ये अनुपम यांचा एकही क्लोज शॉट घेण्यात आलेला नाही.

एका सिनमध्ये तुम्हाला दिसेल की अनुपम खेर यांचा चेहरा वाकडा झालेला आहे. त्यांनी धर्मेंद्रच्या वीरूप्रमाणे दारू पिण्याची ऍक्टिंग केली होती. त्यामध्ये तुम्हाला त्यांचा चेहरा वाकडा दिसेल पण ते ऍक्टिंगच करत आहेत असे तुम्हाला वाटेल.

Leave A Reply

Your email address will not be published.