वा रे पठ्ठ्या! अण्णा हजारे यांच्या ड्रायव्हरने शेतीत केली कमाल, सगळीकडून होतेय वाह वाह

0

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अण्णा हजार यांचा ड्रायव्हर सध्या खुप चर्चेत आहे. आता त्यांना लोक एक प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखू लागले आहेत. त्यांनी शेतात जी कमाल केली आहे ती ऐकून तुम्हालाही त्याचे कौतुक वाटेल.

त्यांची शेतीची सगळी कामे ते रिमोटवर करतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ही जमीन भाडेतत्वावर घेतली आहे. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार मुद्दाम त्याची शेती पाहायला गेले आणि ते थक्कच झाले.

पोपटराव पवार म्हणाले की शेती करावी तर अशी. राळेगणसिद्धी शेजारी असलेल्या पानोली गावाच्या शिवारात संदीप यांची ही आधुनिक शेती आहे. संदीप पठारे अनेक वर्षांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाहनावर ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत.

संदीप यांनी शेतीची मशागत करून व खतांचा वापर करून त्या ठिकाणी तैवान पिंक पेरूची १ हजार ९०० झाडांची ६ बाय १० फुटांवर लागवड केली आहे. त्यांनी गोल्डन सिताफळांचीही लागवड केली आहे.

पाण्याची बचत व्हावी यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाची सोय केली आहे. आंतरपिक म्हणून त्यांनी भोपळ्याचीही लागवड केली आहे. त्यांनी संपुर्ण शिवारात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सौरसंच बसवले आहेत. सौरउर्जेचा वापर करून विहिरीचे पाणी ठिबकद्वारे फळझाडांना व भोपळ्यांना दिले जाते.

जर पाण्याचा दाब कमी झाला किंवा विजेचा दाब कमी झाला तर लगेच संदिप यांच्या मोबाईलवर मेसेज येतो. यासाठी आतापर्यंत चार लाख रूपये खर्च झाला आहे. त्यांनी शेतात पाणी, वेळ यांचे सर्व नियोजन केले आहे.

हे नियोजन खुप महत्वाचे आहे असे संदीप म्हणाले आहेत. आतापर्यंत अनेक मान्यवरांनी त्यांच्या शेतीला भेट दिली आहे. पेरू, सीताफळ आणि त्यामध्ये लावलेले भोपळ्याचे पीक चांगले वाढीस लागले असून याचा त्यांना खुप फायदा होणार आहे.

डांगर भोपळ्याचे पीक तीन महिन्यात हाती येते. जर भोपळ्याचे पीक हाती आले तर त्यांना आतापर्यंत झालेल्या खर्चाएवढा म्हणजे ४ लाख रूपये नफा होईल असे ते म्हणाले आहेत. त्यांना आशा आहे की त्यांचे तेवढे उत्पन्न नक्कीच निघेल.

पेरू आणि सीताफळाचेही त्यांना भरघोस उत्पन्न मिळेल. त्यांच्या शेतीला आण्णा हजारे, सहाय्यक आयुक्त डॉ. गणेश पोटे, माजी सरपंच लाभेष औटी यांनी भेट दिली आहे आणि त्यांच्या या आधुनिक शेतीची खुप प्रशंसा केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.